Motorola चा नवा स्मार्टफोन Motorola Edge 50 Neo अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. Motorola च्या नव्या Motorola Edge 50 Neo फोनची भारतात पहिली विक्री आज म्हणजेच 24 सप्टेंबर 2024 रोजी आहे. हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये लाँच केला आहे. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 256GB स्टोरेज इ. जबरदस्त स्पेक्स मिळतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 Neo वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-
Motorola Edge 50 Neo ची किंमत 23,999 रुपये आहे. या उपकरणाची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर लाइव्ह होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर HDFC बँकेकडून 1500 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. त्याबरोबरच, या डिव्हाइसवर 1,176 रुपयांची EMI ऑफर देखील उपलब्ध आहे.
Motorola Edge 50 Neo मध्ये 6.4 इंच लांबीचा सुपर HD LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर उपलब्ध आहे. हा प्रोसेसर 20% जास्त FPS सह गेमिंग एक्सपेरियन्सना स्पीड देते आणि एनर्जी एफिशियन्सी 20% पर्यंत वाढवते. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Motorola Edge 50 Neo मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमधील पहिला 50MP लेन्स आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. याशिवाय, या सेटअपमध्ये 10MP टेलिफोटो आणि 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 4310mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.