पॉवरफुल फीचर्ससह Motorola Edge 50 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Updated on 01-Aug-2024
HIGHLIGHTS

Motorola Edge 50 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

Motorola Edge 50 स्मार्टफोन भारतात मिड रेंजमध्ये लाँच झाला आहे.

पहिल्या सेलदरम्यान Motorola Edge 50 वर Axis आणि IDFC बँक कार्डवर सूट मिळेल.

Motorola च्या आगामी स्मार्टफोनची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. अखेर आज Motorola Edge 50 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन कंपनीने मिड रेंजमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. यासह Motorola Edge 50 स्मार्टफोन अनेक पॉवरफुल फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 स्मार्टफोनची भारतीय किंमत-

Also Read: नवा POCO M6 Plus 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत केवळ 11,999 रुपये, पहा फीचर्स

Motorola Edge 50 ची भारतात किंमत

Motorola Edge 50 स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन भारतीय बाजारात 25,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 8 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान, फोनवर Axis आणि IDFC बँक कार्डवर सूट मिळेल.

Motorola Edge 50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 50 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा सुपर HD+ पोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz, पीक ब्राइटनेस 600 nits आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये फक्त 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये फोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 Accelerated Edition प्रोसेसर देण्यात आला आहे. Snapdragon 7 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म हे तुमच्यासाठी एकूण गेमिंग पॅकेज आहे. हा प्लॅटफॉर्म हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, तसेच हार्ट-पंपिंग ऑडिओ आणि व्हिज्युअलसह एपिक मोबाइल गेमिंग प्रदान करतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 13MP दुसरा आणि 10MP तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W टर्बो चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. हा फोन ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि डॉल्बी ATMOS सपोर्टसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :