आगामी Motorola Edge 50 ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल स्मार्ट वॉटर टच फिचर, बघा विशेषता

Updated on 26-Jul-2024
HIGHLIGHTS

Motorola Edge 50 स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी

Motorola Edge 50 फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह

Motorola Edge 50 फोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Motorola Edge 50 स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे. MIL-810H प्रमाणित असलेला हा पहिला सर्वात स्लिम फोन असणार आहे. एवढेच नाही तर, फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे या फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 चे भारतीय लॉंचिंग डिटेल्स-

Also Read: सर्वात मजबूत बॉडीसह येणारा HONOR X9b 5G फोनवर प्रचंड Discount उपलब्ध, मिळतेय हजारो रुपयांची सूट

Motorola Edge 50 चे भारतीय लॉंचिंग

वर सांगितल्याप्रमाणे, Motorola Edge 50 फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे फोनच्या लाँच डेटची पुष्टी झाली आहे. हा फोन भारतात पुढील महिन्यात 1 ऑगस्टला लाँच होणार आहे.

वर सांगितल्याप्रमाणे, फोनची अनेक महत्त्वाची फीचर्स Flipkart लिस्टींगद्वारे समोर आली आहेत. हा फोन जंगल ग्रीन, PANTONE पीच फज आणि कोआला ग्रे शेड्स असलेल्या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात येईल.

Motorola Edge 50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, Motorola Edge 50 फोनचे फीचर्स लाँच होण्यापूर्वीच समोर आले आहेत. या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा कर्व pOLED डिस्प्ले असेल. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1.5 पिक्सेल असेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये स्मार्ट वॉटर टच सपोर्ट असेल. यावरून समजलेच असेल की, हा फोन ओल्या हातानेही वापरू शकतील. परफॉर्मन्ससाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 AE प्रोसेसरने सुसज्ज असेल. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी फोनला IP68 रेटिंग दिले जाईल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT 700C प्राथमिक कॅमेरा असेल. यासोबतच 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर असेल. तसेच, आकर्षक ल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 68W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. त्याबरोबरच, 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टही मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :