Price Drop! आगामी फोनच्या लाँचपूर्वीच Motorola Edge 50 Fusion च्या किमतीत घसरण, पहा डील 

Price Drop! आगामी फोनच्या लाँचपूर्वीच Motorola Edge 50 Fusion च्या किमतीत घसरण, पहा डील 
HIGHLIGHTS

Motorola Edge 60 Fusion लवकरच भारतात लाँच होणार

Motorola Edge 50 Fusion च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण

फोटोग्राफीसाठी हे डिव्हाइस OIS सह 50MP सोनी LYT-700C कॅमेरासह येतो.

Motorola चा आगामी स्मार्टफोन Motorola Edge 60 Fusion लवकरच भारतात लाँच होणार आहे. मात्र, नवा फोन लाँच होण्यापूर्वीच कंपनीने विद्यमान मॉडेलची किंमत कमी केली आहे. होय, सध्या Flipkart वर मागील जनरेशनच्या Motorola Edge 50 Fusion च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. Motorola ने हा फोन मिड बजेटमध्ये सादर केला होता. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 Fusion ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Realme P3 5G ची सेल आजपासून होणार सुरु! स्वस्त फोनवर थेट 2000 रुपयांची सूट, पहा किंमत

Motorola Edge 50 Fusion ची किंमत आणि ऑफर्स

Motorola Edge 50 Fusion सध्या Flipkart वर 19,999 रुपयांच्या किमतीत खरेदीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक फ्लिपकार्ट Axis बँक क्रेडिट कार्ड वापरून 5% कॅशबॅक देखील मिळवू शकतात. जर तुम्ही एक्सचेंज डील अंतर्गत तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज केले तर तुम्हाला 12,400 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.

motorola edge 50 fusion

ग्राहक 704 रुपयांपासून दरमहा EMI पर्याय देखील निवडू शकतात. ग्राहक हा फोन फॉरेस्ट ब्लू, फॉरेस्ट ग्रीन, हॉट पिंक आणि मार्शमॅलो ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Motorola Edge 50 Fusion चे फीचर्स आणि स्पेक्स

Motorola Edge 50 Fusion फोन 6.7 इंच लांबीचा FHD+ 10-बिट OLED पॅनेल देते, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. प्रोटेक्शनसाठी हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने संरक्षित आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा मोटोरोला फोन Snapdragon 7S Gen 2 चिपसेटसह सज्ज करण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिवाइस 12GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येते.

तर, फोटोग्राफीसाठी हे डिव्हाइस ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50MP सोनी LYT-700C कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट शूटर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 20,000 रुपयांअंतर्गत येणारा हा फोन तुम्हाला सर्वोत्तम फीचर्स आणि स्पेक्स ऑफर करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo