Motorola Edge 50 Fusion डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स Leak! या दिवशी होणार भातात लाँच। Tech News

Updated on 26-Mar-2024
HIGHLIGHTS

Motorola ने 3 एप्रिल रोजी भारतात आपला Edge 50 Pro लाँच करण्याची घोषणा केली.

Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनशी संबंधित लीक ऑनलाईन शेअर केले जात आहेत.

नवीन Edge 50 Fusion मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

Motorola ने 3 एप्रिल रोजी भारतात आपला Edge 50 Pro लाँच करण्याची घोषणा केली आहे. आता Motorola Edge 50 Fusion मोबाइल देखील या सिरीजअंतर्गत बाजारात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. खास बाब म्हणजे बाजारात येण्यापूर्वी स्मार्टफोनचे रेंडर, डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

हे सुद्धा वाचा: स्टायलिश डिझाईनसह POCO C61 स्मार्टफोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील Powerful फिचर्स। Tech News

Motorola Edge 50 Fusion रेंडर आणि लीक किंमत

Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनशी संबंधित ही लीक काही रिपोर्ट्सद्वारे शेअर केले गेले आहेत. ज्यामध्ये रेंडर इमेज, स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची तारीख उघड झाली आहे. डिव्हाईसच्या डिझाईनमध्ये दोन मोठ्या कॅमेरा कटआउट्ससह कर्व बॅक आहे. फोनमधील डिस्प्ले कर्व देखील पाहिले जाऊ शकते. फ्रंट पॅनलबद्दल बोलायचे झाल्यास, यात कॅमेरासाठी पंच-होल स्क्रीन आहे.

Motorola-Edge-50-Pro-5G

लीकनुसार, Edge 50 Fusion बॅलाड ब्लू, पीकॉक पिंक आणि टाइडल टील या तीन कलर ऑप्शन्समध्ये दिसू शकतो. या सर्व पर्यायांमध्ये टेक्सचर बॅक पॅनल मिळेल. तर शाकाहारी लेदर फिनिश बॅलड ब्लूमध्ये दिले जाऊ शकते. या फोनची किंमत भारतात सुमारे $300 USD किंवा सुमारे 25,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे.

Motorola Edge 50 Fusion चे लीक स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा pOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्यामध्ये Gorilla Glass 5 चे संरक्षण मिळू शकते. परफॉर्मन्ससाठी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जनरल 1 प्रोसेसर वापरकर्त्यांना ऑफर केला जाईल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह प्रदान केला जाऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी नवीन Edge 50 Fusion मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट लेन्स मिळू शकतो. पॉवरसाठी दीर्घकाळ टिकणारी 5000mAh बॅटरी आणि 68W जलद चार्जिंग सपोर्ट प्रदान केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :