Motorola ने आज आपला नवीन Edge सिरीज स्मार्टफोन Motorola Edge 50 Fusion लाँच केला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर ब्रँडने हे आधीच लाइव्ह केले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, IP68 रेटिंग, 5000mAh बॅटरी, 12GB RAM, 68W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा यांसारख्या अनेक खास फीचर्ससह हा फोन बाजारात लाँच केला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Motorola Edge 50 Fusion 5G फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Limited Time Deal! iQOO Quest Days सेलमध्ये प्रचंड सवलतीसह खरेदी करा स्मार्टफोन्स, होणार मोठी बचत |Tech News
Motorola Edge 50 Fusion दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे. तर, फोनचे 12GB + 512GB स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 22 मे पासून सुरू होणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
Motorola Edge 50 Fusion डिव्हाइसमध्ये 6.7 इंच लांबीचा कर्व एज डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 7s Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आहे. याशिवाय, 13MP अल्ट्रा वाईड लेन्स देखील देण्यात आली आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, ड्युअल सिम स्लॉट, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.2, GPS, USB पोर्ट आणि NFC सारखी फिचर्स आहेत.