Motorola Edge 50 First Sale: पहिल्या सेलदरम्यान लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतील बंपर ऑफर्स, पहा किंमत
Motorola Edge 50 गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आला.
आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी Motorola Edge 50 ची पहिली विक्री भारतात सुरु होणार
पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला या मिड बजेट स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स मिळतील.
Motorola ने मागील वर्षी Motorola Edge 50 गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात सादर केला होता. त्यानंतर, आज म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी या स्मार्टफोनची पहिली विक्री भारतात सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन मिड बजेटमध्ये अगदी पॉवरफुल स्पेक्ससह येतो. मोटोरोलाच्या नवीन मोबाईल फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आणि 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Motorola Edge 50 चे पहिल्या सेलमधील ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: बहुप्रतीक्षित Vivo V40 सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि नवीनतम फीचर्स
Motorola Edge 50 ची भारतीय किंमत आणि ऑफर्स
Capture lifelike photos & videos effortlessly with #MotoAI. Adaptive Stabilization ensures smoothness & Long Exposure creates light trails.#MotorolaEdge50 launched in 8+256GB at ₹25,999/-, sale starts 8 Aug @Flipkart, https://t.co/YA8qpSWDkw & leading stores.#CraftedForTheBold
— Motorola India (@motorolaindia) August 7, 2024
Motorola ने नवीनतम स्मार्टफोन Motorola Edge 50 ची किंमत 27,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. या स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लाईव्ह होईल. पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Axis आणि IDFC बँक कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, स्मार्टफोनवर 1,371 रुपयांचा मानक EMI देखील मिळेल.
Motorola Edge 50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 50 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा सुपर HD+ poOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 600 nits इतकी आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Motorola Edge 50 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य सेन्सर, 10MP आणि 13MP इतर लेन्स देखील उपलब्ध आहेत. तर, समोर आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 5000mAh च्या मजबूत बॅटरीसह येतो, जी 68W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile