Motorola Edge 40 स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. तर, आज भारतात या लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल सुरु झाली आहे. विशेषतः Mediatek Dimensity 8020 प्रोसेसरसह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. लाँचसह कंपनीने फोनचे प्री-बुकिंग सुरू केले होते आणि आजपासून फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Motorola Edge 40 स्मार्टफोनची विक्री आज म्हणजेच 30 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरू झाली आहे. हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये आहे.
पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी करताना, तुम्हाला जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन Eclipse Black, Nebula Green आणि Lunar Black कलर ऑप्शन्समध्ये येतो. फ्लिपकार्ट Axis बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळणार आहे. येथून खरेदी करा
हा फोन या सेगमेंटमधील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्याला 144Hz 3D कर्व डिस्प्ले मिळत आहे. स्क्रीन HDR10+ सपोर्टसह येईल. यात 6.55 इंच लांबीचा फुल HD + स्क्रीन देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 8020 प्रोसेसरसह येतो. यात डॉल्बी ATMOS सह स्टिरिओ स्पीकर आहेत. स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मेन कॅमेरा आणि मायक्रो व्हिजनसह 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 4400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W टर्बो पॉवरसह 10 मिनिटांत चार्ज होईल.