Motorola Edge 40 Pro चे स्पेक्स आणि किंमत लाँचपूर्वीच लीक झाली, डिटेल्स पहा
Motorola Edge 40 Pro चे स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर लीक
फोनमध्ये समोर 60MP सेल्फी कॅमेरा असू शकतो.
स्मार्टफोन EUR 850 (सुमारे ₹75,000) मध्ये येऊ शकतो.
Motorola कंपनी Motorola Edge 40 Pro नावाचा नवीन फ्लॅगशिप फोन लॉन्च करणार आहे, अशा अफवा सुरु आहेत. मोटोरोला एज 40 प्रो यूएस मध्ये Motorola Edge+ म्हणून ओळखले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. फोनचे फीचर्स चीनमध्ये नुकत्याच लॉन्च झालेल्या फ्लॅगशिप फोन Moto X40 च्या फीचर्ससोबत मॅच होऊ शकतात. मोटोरोला एज 40 प्रो हा मोटोरोला एज 30 प्रो चा नेक्स्ट जनरेशन फोन म्हणून पाहिला जात आहे, जो गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झाला होता.
हे सुद्धा वाचा : AMAZON रिपब्लिक डे सेल : रु. 2000 पेक्षा स्वस्तात खरेदी करा जबरदस्त स्मार्टवॉच, बघा यादी…
संभावित किंमत :
अहवालानुसार, Motorola Edge 40 Pro युरोपमध्ये EUR 850 मध्ये लॉन्च होऊ शकतो, जे भारतात अंदाजे ₹75,000 इतकी किंमत आहे.
MOTOROLA EDGE 40 PRO चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
एका अहवालानुसार, Motorola Edge 40 Pro 6.7-इंच लांबीच्या फुल एचडी+ कर्व AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो, जो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरद्वारे समर्थित असू शकतो आणि तो फक्त एका स्टोरेज पर्यायासह लॉन्च होण्याची शक्यता आहे, जी 12GB/256GB आहे. डिव्हाइस Android 13 आधारित MyUI 5.0 वर चालेल आणि त्याला 11-लेयर कूलिंग सिस्टम दिली जाऊ शकते.
Motorola Edge 40 Pro 4600mAh बॅटरीसह येऊ शकते, जी 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे 15W वायरलेस चार्जिंग आणि 15W रिव्हर्स चार्जिंगला देखील समर्थन देऊ शकते. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 60-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा फोनच्या फ्रंट पॅनेलच्या शीर्ष-मध्यभागी असलेल्या होल-पंच स्लॉटमध्ये ठेवला जाऊ शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile