Motorola ने गेल्या आठवड्यात ग्राहकांसाठी Moto Edge 40 Neo स्मार्टफोन लाँच केला. त्यानंतर या स्मार्टफोनची विक्री आजपासून म्हणजेच 28 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. तुम्हाला या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये काही उत्कृष्ट फीचर्स मिळणार आहेत. चला बघुयात पहिल्या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट.
फोनची सेल आज 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता Motorola च्या अधिकृत साइटशिवाय Flipkart वर सुरू होईल. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ICICI, Kotak बँकच्या क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळणार आहे. याशिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी व्याजमुक्त EMI ची सुविधा देखील मिळणार आहे.
Motorola Edge 40 Neo च्या बेस व्हेरिएंट म्हणजेच 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर, डिव्हाइसच्या टॉप व्हेरिएंट म्हणजेच तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरज व्हेरिएंटची 25,999 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये हे उपकरण मर्यादित काळासाठी 3,000 रुपयांच्या सवलतीसह अनुक्रमे 20,999 रुपये आणि 22,999 रुपयांना मिळणार आहे.
फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट आणि 360 Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.5-इंच लांबीचा poOLED डिस्प्ले आहे, जो HDR 10 प्लसला सपोर्ट करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7030 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 68W फास्ट चार्जरला सपोर्ट करेल. यासह, हा फोन केवळ 15 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 50% चार्ज होऊ शकतो, असा दावा केला जातो.
कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील भागात 50MP चा अल्ट्रा नाईट व्हिजन कॅमेरा आहे. ज्यासोबतच 13MP चा कॅमेरा अल्ट्रा वाइड, मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा सपोर्टसह येतो. तसेच, फोनच्या फ्रंटमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.