नुकतेच बुधवारी Motorola ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Motorola Edge 50 Pro भारतीय बाजारात लाँच केला. हा लाँच झाल्याबरोबरच कंपनीने जुन्या मॉडेलची म्हणजेच Motorola Edge 40 Neo च्या किमतीत घट केली आहे. हा फोन कंपनीने मागील वर्षी लाँच केला होता. आता एका वर्षानंतर कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देखील मिळेल. चला तर मग बघुयात Motorola Edge 40 Neo ची नवी किंमत-
कंपनीने Motorola Edge 40 Neo फोनची किंमत कमी केली आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. त्यामध्ये ज्यामध्ये 8GB रॅम+128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+256GB स्टोरेज ऑप्शन्स समाविष्ट आहेत. हा फोन पूर्वी 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 23,999 रुपयांना लाँच झाला होता. तर, 12GB रॅम वेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी होती. या फोनमध्ये Soothing Sea आणि Caneel Bay कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, आता या फोनच्या किमतीत कपात झाली आहे. होय, आता कंपनीने Motorola Edge 40 Neo फोन 1000 रुपयांनी स्वस्त केला आहे. यानंतर ते अनुक्रमे 22,999 आणि 24,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात.
Motorola Edge 40 Neo फोनमध्ये 6.55 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय, हा फोन MediaTek Dimensity 7030 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. तर, 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.