Motorola Edge 40 Neo फोन भारतात 32MP सेल्फी कॅमेरासह Launch, बघा किंमत आणि Features। Tech News

Updated on 21-Sep-2023
HIGHLIGHTS

अखेर कंपंनीने Motorola Edge 40 Neo स्मार्टफोन भारतात लाँच केला.

ऑफरसह फोनवर 1000 रुपयांची सूटही दिली जात आहे.

Motorola फोनची विक्री 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल.

मागील बरेच दिवसांपासून Motorola Edge 40 Neo स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा टेक विश्वात सुरु होती. आता अखेर कंपंनीने Motorola Edge 40 Neo स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा कंपनीचा मिड-रेंज स्मार्टफोन आहे, जो 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे. 

Motorola Edge 40 Neo ची भारतीय किंमत

Motorola Edge 40 Neo फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. मात्र, लाँच ऑफरसह हहा स्मार्टफोन 20,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतो. तर, 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन देखील लाँच ऑफर अंतर्गत 22,999 रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकतो. एवढेच नाही तर इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोनवर 1000 रुपयांची सूटही दिली जात आहे, त्यानंतर हे दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे 19,999 आणि 21,999 रुपयांना खरेदी करता येतील.

Motorola Edge 40 Neo ची उपलब्धता

या Motorola फोनची विक्री 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल. या फोनमध्ये  Caneel Bay, Soothing Sea आणि Black Beauty असे तीन कलर व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

Motorola Edge 40 Neo

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 6.55 इंच लांबीचा pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. याशिवाय, फोन MediaTek Dimensity 7030 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB आणि 12GB रॅम पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, स्टोरेजमध्ये 128GB आणि 256GB चे पर्याय समाविष्ट आहेत. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन एका चार्जवर 36 तासांपर्यंत वापरण्याची सुविधा देतो. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-C सपोर्ट आहे.

Motorola Edge 40 Neo च्या कॅमेरा स्पेसीफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये नाईट व्हिजन सपोर्ट आहे. तसेच, फोनमध्ये 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :