Motorola Edge 40 Neo ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, लोकप्रिय लेटेस्ट स्मार्टफोन्सशी होईल स्पर्धा

Motorola Edge 40 Neo ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, लोकप्रिय लेटेस्ट स्मार्टफोन्सशी होईल स्पर्धा
HIGHLIGHTS

Motorola Edge 40 Neo ची भारतीय लाँच डेट जाहीर

आगामी फोनची किंमत 30 हजार ते 35 हजार दरम्यान असू शकते.

फोटोग्राफीसाठी यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य लेन्स मिळण्याची शक्यता आहे.

Motorola च्या आगामी स्मार्टफोन Motorola Edge 40 Neo ची भारतीय लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. Edge 40 लाइनअपमध्ये सामील होणारा हा तिसरा स्मार्टफोन असणार आहे. मोटोरोलाने या वर्षी मे महिन्यात भारतीय बाजारात Motorola Edge 40 सादर केला होता. या 5G फोनची किंमत मिड रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. Motorola Edge 40 Neo भारतात 21 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. हा 5G स्मार्टफोन सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो सारख्या ब्रँडला जबरदस्त स्पर्धा देईल.

 

 

Motorola Edge 40 Neo ची अपेक्षित किंमत 

Motorola ने Edge 40 Neo च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. पण लीकनुसार, फोनची किंमत 30 हजार ते 35 हजार दरम्यान ठेवली जाईल अशी अपेक्षा आहे. 

Motorola Edge 40 Neo चे अपेक्षित फीचर्स 

Motorola Edge 40 Neo मध्ये 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह HD+ डिस्प्ले असेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 1050 प्रोसेसर मिळू शकतो. डायमेन्सिटी 1050 प्रोसेसर सर्वात वेगवान आणि सर्वात कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. हा मोबाइल फोन Android 13 OS वर काम करेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 12GB पर्यत रॅम मिळण्याची शक्यता आहे.  

motorola edge 40 neo

Motorola Edge 40 Neo मध्ये 5,000mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे, जी 68W जलद चार्जिंगला सपोर्टसह येईल. याशिवाय, हँडसेटमध्ये ब्लूटूथ, NFC आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Edge 40 Neo मध्ये फोटो क्लिक करण्यासाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे. तसेच, यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य लेन्स आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल, तर सेल्फीसाठी 32MP कॅमेरा मिळेल. 

लक्षात घ्या की, Motorola Edge 40 Neo ची खरी किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स फोनच्या लाँचनंतरच उघड होतील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo