200MP कॅमेरासह Motorola Edge 30 Ultra भारतात लाँच, 8 हजार रुपयांच्या सवलतीसह फोन खरेदी करा

Updated on 13-Sep-2022
HIGHLIGHTS

Moto Edge 30 Ultra भारतात लाँच

हा Motorola चा 200 मेगापिक्सेल कॅमेरा फोन होय.

आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Motorola चा 200 मेगापिक्सेल कॅमेरा फोन भारतात लॉन्च होण्याची वाट पाहत असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीने भारतात 200 मेगापिक्सेल असलेला जगातील पहिला स्मार्टफोन Moto Edge 30 Ultra लाँच केला आहे. हा फोन चीनमध्ये लॉन्च झालेल्या Moto X30 Pro चा ग्लोबल व्हेरिएंट आहे. हा फोन 8 GB + 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत 59,999 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा : Bigg Boss 16 Teaser : सलमान खान म्हणाला – 'रूल ये है कि कोई रूल नहीं है', बघा VIDEO

 या फोनची विक्री 22 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. सुरुवातीला कंपनी ऑफरअंतर्गत हा फोन 54,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देईल. तसेच, फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये तुम्हाला बँक ऑफरमध्ये 3,000 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीसह ते खरेदी करता येईल. दोन्ही ऑफरसह तुम्हाला फोन 51,999 रुपयांमध्ये मिळेल.

Moto Edge 30 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये, कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल HD + पोलेड डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि पीक ब्राइटनेस लेव्हल 1250 nits आहे. फोन 8GB LPDDR 5 RAM आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजसह सुसज्ज आहे. Android 12 OS वर काम करणाऱ्या या फोनमध्ये कंपनी Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देत आहे.

 त्याबरोबरच, इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4610mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी 125 W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची खास गोष्ट म्हणजे यात 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे. Moto साठी नवीनतम 5G फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.2, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखी फीचर्स आहेत.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील, ज्यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह येतो. प्राइमरी कॅमेर्‍याशिवाय फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्सही देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :