Motorola ने नुकताच Motorola Edge 30 Ultra लाँच केला आहे आणि आता कंपनीने त्याचे नवीन व्हेरिएंट सादर केले आहे. Motorola Edge 30 Ultra आता 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. Motorola Edge 30 Ultra ची विक्री देखील Flipkart वरून सुरू झाली आहे. नवीन व्हेरिएंट आल्यानंतर Motorola Edge 30 रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध झाला आहे.
Motorola Edge 30 Ultra सह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील प्रदान केले आहे. Motorola Edge 30 Ultra च्या 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेजची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट रंगात सादर करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! 15 दिवसांचा बॅटरी बॅकअपसह 'मेड इन इंडिया' स्मार्टवॉच, किंमत तुमच्या बजेटमध्ये
Motorola Edge 30 Ultra ला चार वर्षांसाठी Android 13, 14 आणि 15 अपडेट्स मिळतील. याशिवाय सिक्युरिटी अपडेट्सही मिळतील. फोनमध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंच कर्व POLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये HDR10+ आणि Gorilla Glass 5 प्रोटेक्शन आहे. यात स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे ज्यामध्ये 8 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 128 GB स्टोरेज मिळेल.
Motorola Edge 30 Ultra मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G (13 बँड), 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, GPS/AGPS, NFC, डिस्प्लेपोर्ट 1.4 आणि USB टाइप-C पोर्ट आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W वायरलेस पॉवर शेअरिंग पर्यायांसह 4610mAh बॅटरी आहे. फोनला IP52 रेटिंग मिळाली आहे आणि त्यात डॉल्बी एटमॉस देखील आहे.
याव्यतिरिक्त, Motorola Edge 30 Ultra मध्ये सॅमसंगचा 1/1.22 इंच साईजचा 200-मेगापिक्सेल सेन्सर आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) साठी देखील सपोर्ट आहे. यामध्ये दुसरी लेन्स 50 मेगापिक्सल्स सॅमसंगची अल्ट्रा वाईड अँगल आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्सची आहे. यात टेलिफोटो आणि मॅक्रो मोड देखील मिळतील. फोनसोबत 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.