Motorola चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन नव्या स्टायलिश कलरमध्ये येणार, जाणून घ्या किंमत…
Motorola Edge 30 Fusion नव्या कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
हा स्मार्टफोन Viva Magenta या नवीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
फोनमध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,400mAh बॅटरी आहे.
Motorola ने या वर्षी सप्टेंबरमध्ये Motorola Edge 30 Fusion जागतिक बाजारपेठेत सादर केले. आता कंपनीने हा फोन अमेरिकन मार्केटमध्ये एका शानदार रंगात सादर केला आहे, ज्याचे नाव Viva Magenta आहे, जो 2023 चा Pantone कलर आहे. नवीन रंगात फोन अप्रतिम दिसत आहे. Pantone गेल्या 20 वर्षांपासून वर्षातील सर्वोत्तम रंग निवडत आहे. तो जागतिक ट्रेंड आणि थीम लक्षात घेऊन रंग निवडतो. आम्ही तुम्हाला सांगतो, Motorola ने Globally Pantone सह भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत मोटोरोलाने या रंगात फोन लॉन्च केला आहे. अमेरिकन व्हर्जनची फीचर्स आंतरराष्ट्रीय व्हेरिएंटसारखीच आहेत.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! प्रत्येक GPay पेमेंटवर 50 ते 100 रुपये कॅशबॅक, होईल बंपर कमाई
Motorola Edge 30 फ्यूजनचे तपशील
Motorola Edge 30 Fusion ला 6.5-इंचाचा सेंटर्ड पंच-होल 10-बिट कर्व पोल्ड डिस्प्ले मिळतो, ज्यामध्ये 2400 x 1080 पिक्सेल फुल HD+ रिझोल्यूशन आहे. फोनचा रिफ्रेश रेट 144HZ आणि टच सॅम्पलिंग रेट 360HZ आहे. फोनच्या बॉटमला एक फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि 110 nits ची कमाल ब्राइटनेस आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट मिळतो आणि Android 12 रेडी फॉर सपोर्टसह बूट करतो.
Motorola Edge 30 Fusion मध्ये OIS सपोर्टसह 50MP कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 32MP सेल्फी शूटर उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन समर्थन उपलब्ध आहे. तसेच, मॉडेलमध्ये ड्युअल स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी ATMOS ला सपोर्ट करतात. तसेच फोन IP52 रेटिंग सह येतो.
फोनमध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,400mAh बॅटरी आहे. अतिरिक्त फीचर्समध्ये, फोन डिव्हाइस ड्युअल सिम, 5G, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, GNSS, NFC आणि USB टाइप-C कनेक्टिव्हिटी (USB 3.1) ला समर्थन देते.
किंमत :
Motorola Edge 30 Fusion (Viva Magenta color variant) ची किंमत $799.99 म्हणजेच 65,095 रुपये आहे. Moto Buds 600 ANC TWS इयरबड फोनसोबत उपलब्ध आहेत. जर तुम्हाला बड्स विकत घ्यायचे नसतील तर फोनची किंमत $ 699 म्हणजेच 56,958 रुपये असेल, परंतु फोन ब्लू व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. फोन फक्त AT&T आणि T-Mobile वर काम करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile