मोाबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन ड्रॉईड मॅक्स2 लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन ड्रॉईड मॅक्सचे अपग्रेडेड वर्जन आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला अमेरिकेच्या बाजारात लाँच केले आहे. ह्याची किंमत कोणत्याही कराराशिवाय ३८४ डॉलर(जवळपास २५,००० रुपये) ठेवण्यात आली आहे आणि हा महिन्याच्या शेवटी उपलब्ध होईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात 1.7GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर चिपसेट, एड्रेनो 405 GPU आणि 2GB ची रॅम दिली आहे. त्याशिवाय ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-SD कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकता.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चरचा २१ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि वाइड-लेंस असलेला ५ मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३६३०mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीनुसार, सर्वसाधारण वापरावर हा ४८ तास चालतो.
हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो. हा वॉटर रेपेलेंट कोटिंगसह येईल. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE,3G, वाय-फाय, CDMA आणि अन्य कनेक्टिव्हिटीचे वैशिष्ट्य दिले गेले आहे.