अविश्वसनीय ! नेटवर्क नसतानाही करता येईल मॅसेज, Motorola ने लाँच केला अप्रतिम फोन

Updated on 27-Feb-2023
HIGHLIGHTS

कंपनीचा नवीन फोन Motorola Defy 2 लाँच

कंपनीने ब्लूटूथ कनेक्टेड Motorola Defy सॅटेलाइट लिंक डिव्हाइस देखील सादर केले आहे.

तुम्हाला या फोनमध्ये नेटवर्क नसतानाही मॅसेज करता येईल.

Motorola ने आपला नवीन फोन Motorola Defy 2 लॉन्च केला आहे. Motorola Defy 2 हा एक रग्ड स्मार्टफोन आहे आणि त्यात सॅटेलाइट मेसेजिंगची सुविधा आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसह Motorola Defy 2 उत्तर अमेरिका, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेत लवकरच खरेदीसाठी उपलब्ध केला जाईल. Motorola Defy 2 सह 5G कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे. कंपनीने ब्लूटूथ कनेक्टेड Motorola Defy सॅटेलाइट लिंक डिव्हाइस देखील सादर केले आहे. 

हे सुद्धा वाचा : बिलाचे टेन्शन नाही! Jio Fiber देत आहे मोफत इंटरनेट आणि कॉलिंग, कोणतीही अट नाही

Motorola Defy 2 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Defy 2 मध्ये Android 12 देण्यात आला आहे आणि त्याला Android 14 चे अपडेट देखील मिळेल. फोनला पाच वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील. Motorola Defy 2 मध्ये 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. यामध्ये 6 GB रॅमसह MediaTek Dimensity 930 प्रोसेसर आहे.

त्याबरोबरच, Motorola Defy 2 मध्ये Wi-Fi, 5G, 4G, ब्लूटूथ आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आहे. फोन 15W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी पॅक करतो आणि Qi वायरलेस चार्जिंगला समर्थन देतो. फोनला पाणी प्रतिरोधकतेसाठी IP68 आणि IP69K रेटिंग मिळाले आहे. 

मोटोच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Motorola Defy 2, Motorola Defy सॅटेलाइट लिंक किंमत

Motorola Defy 2 ची किंमत $599 म्हणजेच सुमारे 49,600 रुपये ठेवण्यात आली आहे. यासह, SOS असिस्टंटचे सपोर्ट 12 महिन्यांसाठी उपलब्ध असेल. यासह, मेसेजिंग प्लॅन $ 4.99 च्या फीमध्ये उपलब्ध असेल, म्हणजे सुमारे 400 रुपये प्रति महिना होय. तर, Motorola Defy सॅटेलाइट लिंकची किंमत $99 म्हणजेच जवळपास 8,200 रुपये ठेवण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :