5G Moto Mod सपोर्ट सह येऊ शकतो मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन

5G Moto Mod सपोर्ट सह येऊ शकतो मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन
HIGHLIGHTS

मोटोरोलाचे आगामी सादरीकरण Moto Z4 असू शकते. याची अधिकृतरीत्या समोर आले नाही पण अंदाज असाच आहे की हा डिवाइस Moto Z4 असू शकतो. याची खास बाब हीच आहे कि यात यूजर्सना 5G Moto Mod सपोर्ट मिळू शकतो.

यावर्षी HMD ग्लोबल, Xiaomi आणि Samsung ने एका पाठोपाठ एक अनेक मोबाईल फोन्स लाँच केले आहेत तर मोटोरोला ने आपल्या प्लान्सचा जास्त खुलासा केलेला नाही. प्रॉपर फ्लॅगशिप स्मार्टफोन रिलीज करण्याऐवजी दोन बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स घेऊन हि कंपनी आली. यात Moto E5 Plus, Moto G6 आणि Motorola One Power यांचा समावेश होता. कंपनी ने Moto Z3 लॉन्च केला पण 2017 Snapdragon 835 चिपसेट सह जो Nokia 8 Sirocco मध्ये पण देण्यात आला आहे. त्यामुळे याला एक 2018 फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणता येणार नाही. हो पण पुढल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये असे होऊ शकते की कंपनी काहीतरी खास घेऊन येईल. 

सूत्रांकडून असे समोर आले आहे कि XDA डेवेलपर्सचे काही रिपोर्ट्स असे सांगत आहेत कि मोटोरोला एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे जो Qualcomm Snapdragon 8150 चिपसेट वर चालतो. चिपमेकर मोटोरोलाच्या पुढील जनरेशनचे डिवाइस डिसेंबर किंवा पुढल्या वर्षी सादर करू शकतात. अजूनतरी या नवीन डिवाइसला नाव देण्यात आलेले नाही पण याला 'Odin' कोड नेम देण्यात आले आहे. असा पण अंदाज लावला जात आहे कि हा डिवाइस Moto Z4 असू शकतो.

या नवीन डिवाइस सोबतच मोटोरोला Moto Mods वर पण काम करत आहे जो आगामी डिवाइसला सपोर्ट करू शकतो. याआधी कंपनी ने याचा खुलासा केला होता कि Moto Z चे तीन जनरेशन्स Moto Mods ला सपोर्ट करतील. आणि हा अपकमिंग डिवाइस Moto Z4 चौथ्या जनरेशनचा आहे, त्यामुळे यात Moto Mods चा सपोर्ट असेल कि नाही हे आता सांगता येत नाही.

त्याचबरोबर अशी अशा आहे की हा डिवाइस 5G Moto Mod ला पण सपोर्ट करू शकतो. असे बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन Android 9 Pie वर चालू शकतो आणि यात बायोमेट्रिक फिचर असू शकतात. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo