Motorola च्या Moto Z3 Play स्मार्टफोन बद्दल आलेल्या रेंडर लीक वरून याच्या फीचर्स चा खुलासा झाला आहे. लीक झालेल्या फोटो वरून वाटत आहे की Z3 Play मध्ये 18:9 एस्पेक्ट रेश्यो वाला 6 इंचाचा डिस्प्ले असेल जो फुल HD+ रेजोल्यूशन सपोर्ट सह येईल.
डिवाइस च्या टॉप बेजल्स वर इयरपीस, फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि LED फ्लॅश आहे. फोन मध्ये सर्वात मोठा बदल होम बटन च्या जागी असलेला कंपनी चा लोगो म्हणू शकतो. हँडसेट ला मेटालिक फ्रेम आणि ग्लास रियर देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम अप आणि डाउन बटन्स तसेच साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. पॉवर-की ला फोन च्या दुसर्या बाजूस जागा देण्यात आली आहे.
Moto Z3 Play च्या बॅक वर राउंड-शेप्ड कॅमेरा मोड्यूल मध्ये ड्यूल रियर कॅमेरा दिला गेला आहे. आधीच्या रिपोर्ट्स नुसार या डिवाइस मध्ये 12 आणि 8 मेगापिल्क्स चा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप असेल. Moto Z3 Play च्या बॉटम वर USB-C पोर्ट आहे. बॅक पॅनल च्या खालच्या बाजूस 16 पिन चा कनेक्टर आहे ज्याने Moto Mods एक्सेसरीज जोडता येतील.
Moto Z3 Play काही दिवसांपूर्वी U.S मध्ये फेडरल कम्युनिकेशन कमीशन (FCC) द्वारा सर्टिफिकेशन मिळाले आहे. सर्टिफिकेशन वरून स्पष्ट होते की डिवाइस मध्ये स्नॅपड्रॅगन 636, 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असेल. डिवाइस ची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने वाढवता येते. डिवाइस मध्ये 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आणि 3,000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.