Moto Z2 Force शटरप्रूफ डिस्प्ले आणि 6GB रॅम सह झाला भारतात लॉन्च
Moto Z2 Force मध्ये 5.5-इंचाचा QHD POLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि याची किंमत Rs. 34,999 ठेवण्यात आली आहे.
Moto Z2 Force ला आज भारतात लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत Rs. 34,999 आहे. हा फोन 16 फेब्रुवारी पासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.
फोन बनवण्यासाठी 7000 सीरीजच्या एल्युमीनियम वापरण्यात आला आहे. सोबतच फोनचा डिस्प्ले बनवण्यासाठी 'शटरशील्ड' टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. याच्या मागच्या बाजूस 16 पिंस आहेत, ज्याच्या मुळे मोटो मॉड कनेक्ट करता येतील.
Moto Z2 Force मध्ये क्वालकॉम स्नैपड्रैगन 835 प्रोसेसर आहे ज्याची क्लॉक स्पीड 2.35GHz आहे. यात 5.5-इंचाची QHD POLED शटरशील्ड स्क्रीन आहे. या डिस्प्ले चा रेजोल्यूशन 1440×2560 पिक्सल आहे. ह्या फोन मध्ये 6GB रॅम आणि 64GB ची इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 2TB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
फोन मध्ये 12MP IMX 386 f/2.0 अपर्चर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. एक कलर आणि दूसरा मोनोक्रोम सेंसर आहे. याचा मुख्य कॅमेरा PDAF, LDAF युक्त आहे. हा 4K वीडियो 30fps वर रिकॉर्ड करू शकतो. फोन मध्ये सेल्फी कॅमेरा मध्ये 5MP 85-डिग्री वाइड-एंगल लेंस f/2.2 अपर्चर सह आहे.
हा फोन एंड्राइड 8.0 ओरियो वर चालतो आणि यात 2730mAh ची बॅटरी आहे. यात एक फ्रंट फेसिंग फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी साठी यात 4G डुअल-बैंड वाई-फाई 802.11ac, NFC, LTE, GPS/A-GPS, ब्लूटूथ 4.2, आणि एक USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.