लेनोवोने बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स मोटो Z आणि Z फोर्स लाँच केले आहेत. हे एकाच फोनचे दोन व्हर्जन असल्याचे आपण बोलू शकतो. मोटो Z थोडा पातळ आहे, तर दुस-यात एक मोठी बॅटरी आणि शटरशील्ड स्क्रीन आहे. ज्याविषयी कंपनीचा दावा आहे की, हा पडल्यावरही तुटत नाही. हा स्मार्टफोन भारतात सप्टेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोटो Z स्मार्टफोन 5.2mm इतका पातळ आहे आणि ह्याला एयरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलने बनवले गेले आहे. ह्यात 5.5 इंचाची QHD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा फोन 32GB आणि 64GB च्या एक्सपांडेबल स्टोरेजसह येतो. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा रियर कॅमेरा लेजर ऑटोफोकस, OIS आणि ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात एक फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा आहे. हा डिवाइस 2600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ह्यात USB टाइप-C कनेक्टर दिला गेला आहे आणि हा अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो.
हेदेखील वाचा – काय मिळतय विराट फॅनबॉक्सच्या आत? पाहा आमच्या नजरेतून…
तर मोटो Z फोर्स स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर हा फोन 6.99mm इतका पातळ आहे. ह्यात 3500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ह्या रियर कॅमे-यामध्ये फेज डिटेक्शन ऑटोफोकस आहे. त्याशिवाय ह्याचे इतर फीचर्स मोटो Z सारखेच आहेत. ह्याला जागतिक स्तरावर सप्टेंबरमध्ये लाँच केले जाऊ शकते. आणि ह्या स्मार्टफोन्सला भारतातही तेव्हाच लाँच केले जाईल.
हेेदेखील वाचा – २९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
हेेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये