मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाचा स्मार्टफोन मोटो X (4th Gen) चा एक फोटो लीक झाला आहे. ह्या फोटोमध्ये ह्या स्मार्टफोनच्या मागील डिझाईन दिसत आहे. तसेच हा फोटो पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो, की ह्यात मेटल बॉडी असेल. त्याचबरोबर ह्या फोटोमध्ये ह्या स्मार्टफोनचा रियर कॅमेरासुद्धा दिसत आहे, जो की फ्लॅशसह असेल. ह्या स्मार्टफोनच्या वरील आणि खालच्या बाजूस मागच्या बाजूला प्लॅस्टिकचे कव्हर दिले गेले आहे. स्पीकर ग्रील खालच्या बाजूस दिला गेला आहे. कंपनीचा लोगो कॅमे-याच्या खाली दिला गेला आहे.
मोटो X स्टाइलला भारतात ऑक्टोबर महिन्यात लाँच केले गेले होते. जर मोटो X स्टाइलच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची क्वाडएचडी डिस्प्ले 515ppi पिक्सेल तीव्रतेसह दिली गेली आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरसह 1.8GHz हेक्सा-कोर प्रोसेसरला 3GB रॅमसह पेयर केले गेले आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो.
तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चरसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात एक फ्लॅश दिली गेली आहे, ज्याच्या द्वारे आपण उत्कृष्ट सेल्फी काढू शकता. त्याचबरोबर ह्यात 3000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे.