आज भारतात लाँच होणार मोटो X फोर्स स्मार्टफोन लाँच

Updated on 01-Feb-2016
HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2GHz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB चे LPDDR4 चे रॅम मिळत आहे.

मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटो X फोर्स लाँच करणार आहे. त्यासाठी मोटोरोलाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करत आह. हा स्मार्टफोन अमेरिकेत लाँच केल्या गेलेल्या मोटोरोला ड्रॉयड टर्बो २ चा आंतरराष्ट्रीय प्रकार आहे.   

 

युनायटेड किंग्डममध्ये मोटोरोला मोटो X फोर्स च्या 32GB च्या प्रकाराला  499 ग्रेट ब्रिटेन पाउंड (जवळपास ४९,९०० रुपये) आणि 64GB प्रकाराला 534 ग्रेट ब्रिटेन पाउंड (जवळपास ५३,४०० रुपये) मध्ये सादर केेले गेले होते.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले Shatterproof आहे, ज्याला तोडले जाऊ शकत नाही. ह्याचाच अर्थ ह्या डिस्प्लेला कितीही उंचावरुन फेका, तो तुटणार नाही. ह्या डिस्प्लेला रिजिड कोरने बनवले आहे. हा फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेयर टचस्क्रीन पॅनलने बनवली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.

स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2Ghz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 32GB आणि 64GB च्या प्रकारात मिळेल. आणि प्रकारांना मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी मिक्स वापरल्यावरसुद्धा २ दिवसाचा बॅटरी बॅकअप देते आणि बॅटरी क्विक चार्जला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चरसह ड्यूल LED फ्लॅशसह मिळत आहे.स्मार्टफोनमध्ये फेज डिटेक्ट ऑटोफोकस, त्याशिवाय 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा f/2.0 अॅपर्चरसह लाँच झाला आहे.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलो सपोर्ट नाही. हा फोन 4G LTE ला सपोर्ट करतो.

हेदेखील वाचा- वनप्लस 2 चा 16GB चा प्रकार भारतात विक्रीसाठी उपलब्ध

हेदेखील  वाचा- आता कोणत्याही निमंत्रणाशिवाय उपलब्ध होणार वनप्लस X स्मार्टफोन

 

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :