मोटोरोलाने अशी घोषणा केली आहे की, त्याचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Moto X force आता भारतातील रिटेल स्टोर्सवरसुद्धा मिळेल. ह्याला आपण क्रोमा, स्पाइस, हॉटस्पॉट, विजय, सेल्स आणि पूर्विक्रियाद्वारे सहजपणेे घेऊ शकता. ग्राहक ह्याला ४०० पेक्षा जास्त स्टोर्स आणि 15 शहरांमध्ये अगदी सहजपणे घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याजवळ क्रेडिट कार्ड असेल तर आपण ह्या स्मार्टफोनला हप्त्यांमध्येसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडिलवरसुद्धा उपलब्ध आहे.
मोटो X फोर्स स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले “Shatterproof” आहे, जो तुटू शकत नाही. याचाच अर्थ की, ह्याची डिस्प्ले आपण कितीही उंचावरुन फेकली तरीही, ती तुटू शकत नाही. ह्या डिस्प्लेला अॅल्युमिनियम रिजिड कोर ने बनवले आहे. त्याचबरोबर फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेअर टचस्क्रीन पॅनलने बनलेली आहे. तसेच हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.
स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले गेले आहे, जो 2GHz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 32GB आणि 64GB अशा दोन प्रकारात मिळत आहे. ह्या दोन्ही प्रकारात आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी वापरल्यावर सुद्धा २ दिवसाचे बॅटरी बॅकअप देते. आणि ही बॅटरी क्विक चार्जलासुद्धा सपोर्ट करते.
हेदेखील वाचा – MWC 2016 : गुगलचा पहिला मिड रेंज स्मार्टफोन ‘अॅनड्रॉईड वन’ लाँच
हेदेखील वाचा – इंटेक्स अॅक्वा फिश: सेलफिश ओएस 2.0 ने आहे सुसज्ज