मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला १ फेब्रुवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटो X फोर्स लाँच करेल. खरे पाहता, मोटोरोला ह्या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, आणि कंपनीने त्यासाठी मिडिया वेबसाइटवर निमंत्रण पाठवणे सुरु केले आहे.
मोटोरोला गेल्या काही दिवसांपासून मोटो X फोर्स भारतात लाँच करण्यासंबंधी एक टीजर जारी करत आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्याच्या दरम्यानच ह्याला भारतातसुद्धा लाँच करणार असल्याची माहिती दिली जातेय. मोटोरोलाने ह्या स्मार्टफोनला २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केले होते.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले Shatterproof आहे, ज्याला तोडले जाऊ शकत नाही. ह्याचाच अर्थ ह्या डिस्प्लेला कितीही उंचावरुन फेका, तो तुटणार नाही. ह्या डिस्प्लेला रिजिड कोरने बनवले आहे. हा फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेयर टचस्क्रीन पॅनलने बनवली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.
स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2Ghz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 32GB आणि 64GB च्या प्रकारात मिळेल. आणि प्रकारांना मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी मिक्स वापरल्यावरसुद्धा २ दिवसाचा बॅटरी बॅकअप देते आणि बॅटरी क्विक चार्जला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चरसह ड्यूल LED फ्लॅशसह मिळत आहे.स्मार्टफोनमध्ये फेज डिटेक्ट ऑटोफोकस, त्याशिवाय 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा f/2.0 अॅपर्चरसह लाँच झाला आहे.
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलो सपोर्ट नाही. हा फोन 4G LTE ला सपोर्ट करतो.