सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोल्डेबल फोनपैकी एक असेल Moto Razr 40 Ultra, डिटेल्स लीक

Updated on 23-May-2023
HIGHLIGHTS

Moto Razr 40 Ultra स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार

लीक्सनुसार, हा स्मार्टफोन स्वस्त फोल्डेबल फोनपैकी एक असेल.

डिव्हाइस ड्युअल लेन्स कॅमेरा सिस्टमसह येऊ शकतो.

अनेक स्मार्टफोन ब्रँडचे फोल्डेबल फोन पर्याय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. अशामध्ये Motorola आपला आगामी Razr 40 Ultra स्मार्टफोन देखील लवकरच भारतात लाँच करणार आहे. या नव्या फोल्डेबल फोनबद्दल बरेच लीक्स येत आहेत. परंतु कंपनीने अद्याप या लीक्सबाबत काहीही पुष्टी केलेली नाही. आता या फोनचा एक नवीन लीक समोर आली आहे. 

टिपस्टर अभिषेक यादवने इजिप्शियन साइट Extra.com वर फोल्डेबल फोन पाहिला, ज्याने Moto Razr 40 Ultra चे स्पेक्स आणि इमेजेस उघड केले आहेत.

Moto Razr 40 Ultra ची संभावित किंमत

लीक्सने असे सुचवले आहे की, Moto Razr 40 Ultra 1 जूनच्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे. डिव्हाइस सुमारे 88,400 रुपयांमध्ये येऊ शकतो. जो बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त फ्लॅगशिप-ग्रेड फोल्डेबल फोनपैकी एक असण्याची शक्यता असेल. 

संभावित फीचर्स आणि स्पेक्स

आगामी फोल्डेबल फोनमध्ये 6.9-इंच लांबीचा FHD+ POLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. तसेच, डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपद्वारे समर्थित केले जाऊ शकते. फोनमध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज पर्याय मिळण्याची शक्यता आहे. डिव्हाइस ड्युअल लेन्स कॅमेरा सिस्टमसह येऊ शकतो, ज्यामध्ये 32MP प्राथमिक लेन्स आणि 8MP सेकंडरी लेन्स समाविष्ट करणे अपेक्षित आहे. 

याशिवाय, वेबसाईटद्वारे हे देखील पुढे आले आहे की, स्मार्टफोन 3800mAh बॅटरीसह येईल. मात्र, त्याच्या चार्जिंग सपोर्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. लिक्समध्ये फोनचे कलर ऑप्शन्स देखील पुढे आले आहेत. आगामी स्मार्टफोन हे ग्लेशियर ब्लू, व्हिवा मॅजेन्टा आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :