Moto Razr 40 Ultra फोल्डेबल फोनचा नवीन व्हेरिएंट दाखल, लाँच होताच 17 हजार रुपयांचा Discount! Tech News 

Moto Razr 40 Ultra फोल्डेबल फोनचा नवीन व्हेरिएंट दाखल, लाँच होताच 17 हजार रुपयांचा Discount! Tech News 
HIGHLIGHTS

या वर्षी जुलैमध्ये ग्राहकांसाठी Moto Razr 40 आणि Moto Razr 40 Ultra लाँच केले गेले.

कंपनीने Moto Razr 40 Ultra चा Glacier Blue कलर व्हेरिएंट बाजारात सादर केला आहे.

तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंटवर 7,000 रुपयांच्या बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ मिळेल.

प्रसिद्ध हँडसेट निर्माता Motorola ने या वर्षी जुलैमध्ये ग्राहकांसाठी Moto Razr 40 आणि Moto Razr 40 Ultra लाँच केले. लाँच होताच हे फोल्डेबल ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. हा फोल्डेबल फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर, आता कंपनीने Moto Razr 40 Ultra चा Glacier Blue हा आणखी एक कलर व्हेरिएंट बाजारात सादर केला आहे.

हे सुद्धा वाचा: Free चे दिवस गेले! WhatsApp युजर्सच्या खिशावर पडणार ताण, App चालवायला द्यावे लागतील पैसे? Tech News

MOTO RAZR 40

Moto Razr 40 Ultra ची किंमत

Motorola च्या या मोबाईल फोनच्या 8GB RAM / 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे. हा डिवाइस ई-कॉमर्स साइट Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या हा फोन थेट 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 79,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे.

फोनवर उपलब्ध इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंटवर 7,000 रुपयांच्या बँक कार्ड डिस्काउंटचा लाभ मिळेल. या ऑफर्ससह फोनची किंमत 72,999 रुपये असेल. अशाप्रकारे फोनवर तुम्ही तब्बल 17 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता.

Moto Razr 40 Ultra

या फोनमध्ये 3.6 इंच लांबीचा Quickview pOLED कव्हर डिस्प्ले आहे, जो 144 Hz रिफ्रेश रेट आणि 360 Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. तर, 165Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंच लांबीचा फ्लेक्सव्यू pOLED डिस्प्ले प्रदान देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Snapdragon 8 प्लस Gen 1 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी Adreno 730 GPU वापरण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 12MP च्या प्रायमरी कॅमेरासह 13MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी 32MP कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 33W फास्ट चार्ज सपोर्टसह 3800mAh बॅटरी उपलब्ध असेल.

फोनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तम आवाजासाठी स्टिरिओ स्पीकर्स दिले गेले आहेत. सुरक्षेसाठी, तुम्हाला फोनच्या बाजूला एक फिंगरप्रिंट सेंसर मिळेल, जो कंपनीने फोनच्या पॉवर बटनमध्ये इंटिग्रेट केला आहे. जर तुम्हाला या बजेटमध्ये चांगला फोल्डेबल फोन हवा असेल तर, हा फोन तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo