Motorola चे दोन जबरदस्त स्मार्टफोन नवीन अवतारात लाँच, बघा नवा स्टायलिश लुक आणि किंमत। Tech News

Updated on 12-Jan-2024
HIGHLIGHTS

Moto Razr 40 Ultra आणि Moto Edge 40 Neo नव्या रंगरूपात लाँच

ही उपकरणे नवीन ‘पीच फझ’ शेडमध्ये सादर केली गेली आहेत.

नव्या अवतारातील Moto Razr 40 Ultra आजपासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध

Motorola ने आपले Moto Razr 40 Ultra आणि Moto Edge 40 Neo स्मार्टफोन्स भारतात एका नव्या कलरमध्ये लाँच केले आहेत. ही उपकरणे नवीन ‘पीच फझ’ शेडमध्ये सादर केली गेली आहेत, जो 2024 चा पॅन्टोन कलर आहे. नव्या रूपात लाँच झालेल्या Razr 40 Ultra आजपासून Amazon आणि इतर रिटेलर्सकडे खरेदीसाठी उपलब्ध देखील झाला आहे. बघुयात नव्या फोनचा स्टायलिश लुक आणि इतर तपशील-

Moto Razr 40 Ultra

Razr 40 Ultra स्मार्टफोनचे सिंगल 8GB + 256GB मॉडेल Amazon वर 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू, इन्फिनिटी ब्लॅक, व्हिवा मॅजेन्टा आणि पीच फझ या चार कलर ऑप्शन्समध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे. बँक डिस्काउंटद्वारे ग्राहकांना 1750 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. याशिवाय, Amazon एक्सचेंज ऑफरद्वारे 32,050 रुपयांपर्यंत सूट देखील मिळू शकते.

या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 6.9-इंच लांबीचा FHD+ pOLED 165Hz मेन आणि 3.6-इंच लांबीचा 144Hz pOLED कव्हर डिस्प्लेसह येतो. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 30W वायर्ड चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंगसह 3800mAh बॅटरी मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12MP OIS + 13MP UW रिअर आणि 32MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.

Moto Edge 40 Neo

Moto Edge 40 Neo ची सुरुवातीची किंमत 8GB + 128GB मॉडेलसाठी 22,999 रुपये आहे. तर 12GB + 256GB व्हेरिएंट 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर तुम्हाला ऑफर्सदेखील मिळतील. Flipkart Axis Bank कार्डद्वारे ग्राहक या फोनवर 5% पर्यंत सूट मिळवू शकतात. एक्सचेंजसाठी तुम्हाला या फोनच्या टॉप मॉडेलवर 24,160 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हा फोन तुम्हाला ब्लॅक, ब्युटी, कनिल बी, पीच फज आणि सुखींग सी या कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.

Moto Edge 40 Neo च्या मेन स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 6.55-इंच लांबीच्या FHD+ pOLED 144Hz स्क्रीन डायमेन्सिटी 7030, Android 13-आधारित MyUI, 68W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी, 50MP OIS + 13MP रीअर कॅमेरा, 32MP सेल्फी शूटर आणि पाणी प्रतिकारासाठी IP68 रेटिंगसह सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :