नव्या रंगरूपात लाँच झाले Motorola चे दोन जबरदस्त स्मार्टफोन्स, फ्लिप फोनचा New लुक आवडेल तुम्हाला। Tech News 

नव्या रंगरूपात लाँच झाले Motorola चे दोन जबरदस्त स्मार्टफोन्स, फ्लिप फोनचा New लुक आवडेल तुम्हाला। Tech News 
HIGHLIGHTS

Motorola ने Moto Razr 40 Ultra आणि Moto Edge 40 Neo या यावर्षी सुरुवातीला लाँच केले.

हे दोन्ही स्मार्टफोन्स आता नव्या रंगात रूपात सादर करण्यात आले आहेत.

Motorola India ने देखील स्मार्टफोनच्या नव्या व्हेरिएंटच्या उप्लब्धतेबद्दल टीज केले आहे.

Motorola ने Moto Razr 40 Ultra आणि Moto Edge 40 Neo या वर्षाच्या सुरुवातीला अनेक मार्केटमध्ये लाँच केला होते. लक्षात घ्या की, Razr 40 मॉडेल सुरुवातीला Infinite Black आणि Viva Magenta शेड्समध्ये लाँच करण्यात आले तर, नोव्हेंबरमध्ये फोनसह तिसरा ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शन जोडला गेला. दरम्यान, Edge 40 Neo स्मार्टफोन ब्लॅक ब्यूटी, कॅनेल बे आणि सूथिंग सी कलर व्हेरिएंन्टमध्ये सादर करण्यात आला

हे सुद्धा वाचा: Vivo X100 आणि X100 Pro चे ग्लोबल लाँच कन्फर्म! किती असेल किंमत? जाणून घ्या संभावित फीचर्स। Tech News

त्यानंतर, आता हे फोन काही देशांमध्ये आणखी नवीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की, हे हँडसेट ‘Peach Fuzz’ कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असतील, जो 2024 चा Pantone कलर आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही फोनचे नवीन व्हेरिएंट कंपनीच्या युरोपियन वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आहेत.

लक्षात घ्या की, Motorola India ने देखील स्मार्टफोनच्या नव्या व्हेरिएंटच्या उप्लब्धतेबद्दल टीज केले आहे. अधिकृत वेबसाईटवर असलेल्या मायक्रोसाईटद्वारे या एडिशनची पुष्टी करण्यात आली आहे.

Moto Razr 40 Ultra

Moto Razr 40 Ultra New Color
Moto Razr 40 Ultra New Color

Moto Razr 40 Ultra च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत भारतात 79,999 रुपये आहे. Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोन 165Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंच लांबीचा फुल HD+ POLED इनर डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 3.6-इंच लांबीचा POLED कव्हर स्क्रीन आहे. त्याबरोबरच, हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह सुसज्ज आहे. फोनमध्ये 3800mAh बॅटरी आहे, जी 30W वायर्ड आणि 5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto Edge 40 Neo

Motorola Edge 40 Neo New Color
Moto Edge 40 Neo New Color

Moto Edge 40 Neo ची किंमत 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी 22,999 रुपयांपासून सुरू होते. तर, त्याचा हाय-एंड 12GB + 256GB पर्याय 24,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Motorola Edge 40 Neo मध्ये 6.55 इंच लांबीचा फुल HD+ POLED कर्व डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोन MediaTek Dimensity 7030 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 50MP OIS मुख्य सेन्सर आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जो 68W वायर्ड फास्ट चार्जिंगला समर्थन देते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo