Surprise! लेटेस्ट Moto Razr 40 सिरीजच्या किमतीत मोठी कपात, तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त। Tech News 

Surprise! लेटेस्ट Moto Razr 40 सिरीजच्या किमतीत मोठी कपात, तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त। Tech News 
HIGHLIGHTS

सिरीजमध्ये Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोन समाविष्ट

Motorola आणि Amazon साइटवर 'Moto Days' सेल सुरू आहे.

कंपनीने Motorola Razr 40 सीरीज 10,000 रुपयांनी स्वस्त केली.

Motorola Razr 40 सिरीज भारतात या वर्षी जुलै महिन्यात लाँच करण्यात आली होती. या सिरीजमध्ये Moto Razr 40 आणि Moto Razr 40 Ultra स्मार्टफोन समाविष्ट आहेत. दरम्यान, लाँचच्या 5 महिन्यांनंतर कंपनीने फोनची किंमत कमी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सिरीज 10,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

दरम्यान, Motorola आणि Amazon साइटवर ‘Moto Days’ सेल सुरू आहे. किंमतीतील कपात व्यतिरिक्त या सेल दरम्यान तुम्ही फोन आणखी स्वस्त खरेदी करू शकता. चला तर मग दोन्ही फोनची नवी किंमत जाणून घेऊयात.

Moto Razr 40 Ultra New Color
Moto Razr 40 Ultra New Color

हे सुद्धा वाचा: IQOO चे लेटेस्ट स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह खरेदी करण्याची संधी, Amazon वर Best डिल्ससह उपलब्ध

Motorola Razr 40 ची नवीन किंमत

Motorola Razr 40 स्मार्टफोन जुलैमध्ये 59,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. तर, Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोनची किंमत 89,999 रुपये आहे. मात्र, आता कंपनीने फोनची किंमत कमी केली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Motorola Razr 40 सीरीज 10,000 रुपयांनी स्वस्त केली आहे. त्यानुसार, या दोन्ही स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 49,999 आणि 79,999 रुपये झाले आहेत.

वर सांगितल्याप्रमाणे, सध्या Moto Days सेल देखील सुरु आहे. ही सेल 18 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलदरम्यान दोन्ही फ्लिप फोनवर अतिरिक्त डिस्काउंट ऑफर देखील सुरु आहेत. सेल दरम्यान तुम्ही हे दोन्ही फोन ऑफर्ससह अनुक्रमे केवळ 44,999 आणि 72,999 रुपयांना खरेदी करू शकता.

Motorola Razr 40 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Motorola Razr 40 फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मेन आणि 1.5 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 144Hz आहे. तर, Motorola Razr 40 Ultra फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा मेन आणि 3.6 इंच कव्हर डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे.

moto razr 40 in amazon sale

प्रोसेसर

Motorola Razr 40 फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, Motorola Razr 40 Ultra फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Motorola Razr 40 मध्ये 64MP प्रायमरी आणि 13MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे. तर, फोटोग्राफीसाठी Motorola Razr 40 Ultra फोनमध्ये 12MP प्रायमरी आणि 13MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी

Motorola Razr 40 फोनची बॅटरी 4200mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर, Motorola Razr 40 Ultra फोनची बॅटरी 4200mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo