Motorola च्या Moto Razr 40 स्मार्टफोनला लाँच होताच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जर तुम्ही 50,000 रुपयांच्या आत नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या Moto Razr 40 स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हा फोन फोल्डेबल सेगमेंटमध्ये सर्वात कमी किमतीचा फोन आहे. चला तर मग बघुयात फोल्डेबल स्मार्टफोनची नवी किंमत-
गेल्या वर्षी हा Motorola स्मार्टफोन 59,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता 15,000 रुपयांच्या सवलतीनंतर ग्राहक Moto Razr 40 स्मार्टफोन 44,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हे फोल्डेबल सेज ग्रीन, समर लिलाक आणि व्हॅनिला क्रीम कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येतात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर 10% झटपट सूट देखील देत आहे.
हा फ्लिप फोन 6.9-इंचा लांबीच्या FlexView FHD+ डिस्प्लेसह येतो. फोनचा मेन डिस्प्ले 144Hz रीफ्रेश रेट आणि 1400 nits पर्यंत कमाल ब्राइटनेस ऑफर करतो. या उपकरणाची आऊटर स्क्रीन 1.47 इंच लांबीची आहे, जी 368×194 पिक्सेल रिझोल्यूशन देते, यासह 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसच्या लेयरद्वारे संरक्षित आहे. हा फोन उत्तम कार्यक्षमतेसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेटसह 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64MP मेन सेन्सर आणि 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. याशिवाय, फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 4200mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्हाला USB टाइप-C आणि डॉल्बी ATMOS सह स्टीरिओ स्पीकर देखील मिळतील. तसेच, सुरक्षेसाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील प्रदान करण्यात आला आहे.