Moto G85 5G Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Moto G85 5G अलीकडेच भारतीय बाजरात लाँच केला. त्यानंतर, या फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 16 जुलै 2024 रोजी आहे. ही विक्री दुपारी 12 वाजल्यापासून शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लाइव्ह असेल. आम्ही तुम्हा सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान फोनवर परवडणाऱ्या EMI वर सूट दिली जाईल. मुख्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सारखे पॉवरफुल फीचर्स मिळतील.
Also Read: Realme 13 Pro 5G: आगामी सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल HYPERIMAGE+ AI कॅमेरा सिस्टम
नवीनतम Moto G85 5G च्या 8GB+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. तर, त्याचा 12GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफिसबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनही मॉडेल्सवर 1000 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, दरमहा 2,000 रुपये EMI देखील उपलब्ध आहे.
Moto G85 5G डिव्हाइसमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी फोनवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन ग्लास बसवण्यात आला आहे. त्याबरोबरच, स्मूथ फंक्शनिंगसाठी यामध्ये Qualcomm च्या Snapdragon 6s Gen 3 चिपसेट मिळेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन ब्रँड Motorola ने या स्मार्टफोनमध्ये 8MP मॅक्रो आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह OIS सपोर्ट करणारा 50MP कॅमेरा दिला आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये एक 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तुम्ही सेल्फीचे शौकीन असाल तर ही लेन्स तुमच्यासाठी योग्य आहे. पॉवरसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो पूर्ण चार्ज केल्यावर 90 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतो, असा कंपनीचा दावा आहे.
या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.