आकर्षक डिझाईनसह Motorola चा 5G फोन आज भारतात लाँच होणार, बघा किंमत आणि अप्रतिम फीचर्स

Updated on 07-Jun-2022
HIGHLIGHTS

Moto G82 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार

या स्मार्टफोनची किंमत जवळपास 25 हजार रुपये असण्याची शक्यता.

फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी उपलब्ध.

Motorola आज म्हणजे 7 जून रोजी भारतात Moto G82 5G लाँच करण्यासाठी सज्ज आहे. हा फोन युरोपीय  बाजारात आधीच लाँच झाला आहे, त्यामुळे याच्या फीचर्सबद्दल सर्व माहिती उपलब्ध आहे. त्याबरोबरच, एका टिपस्टरने Moto G82 5G च्या किंमतीबद्दल देखील माहिती दिली आहे. Moto G82 5Gमध्ये 6.6-इंच लांबीचा डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात Moto G82 5G ची किंमत आणि अप्रतिम फीचर्स… 

Moto G82 5G ची भारतात किंमत

टिपस्टर योगेश बरार यांच्या मते, Motorolaच्या Moto G82 5G ची 6GB + 128GB मेमरी कॉन्फिगरेशनसाठी फक्त भारतात 23,999 रुपये बॉक्स किंमत आहे. दुसऱ्या टिपस्टरनुसार, Moto G82 ची भारतीय किंमत 25,999 रुपये ठेवली जाऊ शकते. 

हे सुद्धा वाचा: Airtelचा मोठा निर्णय! रिचार्ज प्लॅनमधून काढून घेतली ही सुविधा, चित्रपट बघता येणार नाहीत

Moto G82 5G चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Moto G82 5G फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा 10-बिट FHD+ 120Hz पोल्ड डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट, 50MP (वाइड, OIS) + 8MP (अल्ट्रावाइड) + 2MP (मॅक्रो) अशाप्रकारे ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. त्यानंतर, आकर्षक सेल्फीसाठी यात 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

Moto G82 5G चे फीचर्स

डिव्हाइसच्या इतर फीचर्समध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी ATMOS -समर्थित ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. तसेच, यामध्ये Android 12 आणि 13 5G बँड समाविष्ट आहेत.

Moto G82 5G बॅटरी

या डिवाइसमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन ग्रे किंवा व्हाईट लिली कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. शेवटी टीपस्टरच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनला दोन अँड्रॉइड अपडेट्स मिळणार आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :