हँडसेट निर्माता Motorola ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात Moto G73 5G स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच केला आजपासून या हँडसेटची विक्री फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. सेल सुरू होण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला Moto G73 5G मोबाइल फोनसह उपलब्ध ऑफर, किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…
हे सुद्धा वाचा : खुशखबर ! 10 वर्षे जुने Aadhaar Card घरबसल्या अपडेट करण्याची सुवर्ण संधी, ते सुद्धा मोफत…
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यावर लाँच ऑफरचा फायदा मिळाल्यानंतर, या फोनची किंमत 16,999 रुपये असेल. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लू आणि व्हाइट या दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.
मोटोरोलाच्या या मोबाइलमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा फुल HD प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. हा हँडसेट 20:9 आस्पेक्ट रेशो सह लॉन्च करण्यात आला आहे. Moto G73 5G मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Dimensity 930 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येते.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जला सपोर्ट करते. फोनच्या मागील पॅनलवर दोन रियर कॅमेरे दिले आहेत, 50MP प्राथमिक सेन्सरसह 8MP अल्ट्रा-वाइड अँगल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.