Motoचा नवीन 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल हाय-टेक सिक्योरिटी
Moto G73 5G मिड रेंज स्मार्टफोन भारतात लाँच
फोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 18,999 रुपये
फोन निवडक बँक कार्ड्ससह खरेदीवर 2,000 रुपयांची सूट
Motorola ने शुक्रवारी आपला मिड-रेंज स्मार्टफोन Moto G73 5G भारतात लाँच केला. हा फोन 20 हजारांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर फोनसोबत ThinkShield मोबाइल सिक्योरिटी देखील उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि फीचर्स…
हे सुद्धा वाचा : भारीच की ! 60 हजारांचा Lenovo लॅपटॉप निम्म्या किमतीत उपलब्ध,'अशा'प्रकारे करा ऑर्डर
Moto G73 5G किंमत
Moto G73 5G भारतात सिंगल स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन ल्युसेंट व्हाईट आणि मिडनाईट ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. फोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 16 मार्चपासून फ्लिपकार्ट तसेच निवडक रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.
फोन निवडक बँक कार्ड्ससह खरेदीवर रु. 2,000 सूट आणि Axis, HDFC, ICICI आणि SBI कार्ड्सवर दरमहा रु. 3,167 च्या नो-कॉस्ट EMI पर्यायांसह येतो.
Moto G73 5G
फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G73 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह (1,080×2,400 पिक्सेल) रिझोल्यूशन आहे. फोनला MediaTek Dimensity 930 प्रोसेसरसह 128 GB स्टोरेज क्षमता आणि 8 GB पर्यंत RAM मिळते.
Moto G73 5G ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये Android 13 उपलब्ध आहे आणि कंपनी फोनसोबत Android 14 अपडेट देणार आहे. त्याचबरोबर फोनसोबत तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्सही मिळणार आहेत.
Moto G73 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा उपलब्ध आहे, जो f/1.8 अपर्चरसह येतो. सेकंडरी कॅमेरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड मॅक्रो डेप्थ शूटर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने Moto G73 5G सह 5,000mAh बॅटरी पॅक केली आहे, जी 30W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile