आकर्षक डिझाईनसह Moto G72 लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या फोनचे अपेक्षित फीचर्स

आकर्षक डिझाईनसह Moto G72 लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या फोनचे अपेक्षित फीचर्स
HIGHLIGHTS

Moto G72 लवकरच भारतात होणार लाँच

हा स्मार्टफोन मोटो G71 चा सक्सेसर म्हणून लाँच केला जाईल

5,000mAh बॅटरी, 33W TurboPower फास्ट चार्जिंगसह येणार

Motorola आणखी एक G सीरीज स्मार्टफोन म्हणजेच Moto G72 लाँच करण्याच्या तयारीत आहे, यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC), टेलिकॉम अँड डिजिटल गव्हर्नमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी (TDRA) UAE, भारतीय मानक ब्यूरो (BIS) आणि IMEI यासह अनेक प्रमाणन साइटवर हे डिवाइस दिसले आहे. हे डिव्हाइस मागील वर्षी लाँच झालेल्या Moto G71 चा सक्सेसर असेल, असे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : BSNL ची अप्रतिम ऑफर ! एक वर्षासाठी ऍक्टिव्ह राहील सिम, किंमत केवळ 321 रुपये

Moto G72 लवकरच भारतात लाँच होणार

MySmartPrice द्वारे सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, Moto G72 स्मार्टफोन FCC, TDRA आणि BIS वेबसाइटवर तसेच मॉडेल क्रमांक XT2255 सह IMEI डेटाबेसवर दिसला आहे. डिव्हाइसची FCC सूची सूचित करते की ते 5,000mAh च्या बॅटरी कॅपॅसिटीसह येईल.

फोनमध्ये 33W जलद चार्जिंगसाठी सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच, Moto G72 ची BIS सूची पुष्टी करते की डिव्हाइस भारतात देखील लाँच केले जाईल. अलीकडे, मोटोरोला भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत बरेच फोन लाँच करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, भारतात Moto G32 आणि Moto G62 लाँच केले. 

याव्यतिरिक्त, लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने 8 सप्टेंबर रोजी जागतिक बाजारपेठेत तीन एज सिरीज स्मार्टफोन लाँच करण्याची पुष्टी केली आहे.

Moto G72 ची अपेक्षित स्पेसिफिकेशन्स 

Moto G72 या वर्षाच्या सुरुवातीला मोटो G71 चा सक्सेसर म्हणून भारतात Qualcomm च्या Snapdragon 695 SoC, 5,000mAh बॅटरी, 33W TurboPower फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाईल. मोटो G71 चे  बेस 6GB + 128GB वेरिएंटसाठी 15,999 रुपयांच्या किंमतीसह आले आहे. Moto G72 ची किंमत देखील याच्या आसपास राहील अशी अपेक्षा आहे. डिव्हाइसमध्ये ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप आणि पंच होलसह 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देखील आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo