Motorola ने आपला नवीन स्मार्टफोन Moto G72 भारतात लाँच केला आहे. हा फोन 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतो. कंपनीने हा फोन फक्त 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला आहे, त्याची किंमत 18,999 रुपये आहे. फोनची विक्री 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, तुम्ही मोटोरोलाच्या भागीदार रिटेल स्टोअरमधून हा फोन खरेदी करू शकता.
हे सुद्धा वाचा : SBI ग्राहकांनो त्वरा करा! Amazon Saleमधील पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस, बघा स्मार्ट TVवरील सर्वोत्तम डील्स
या मोटो फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंच लांबीचा फुल HD + POLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि त्याचा टच सॅम्पलिंग रेट 576Hz आहे. फोनमध्ये 6 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी तुम्हाला या फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील.
कंपनीने आश्वासन दिले आहे की, ती या फोनसाठी तीन वर्षांसाठी अपडेट आणि सिक्युरिटी पॅच जारी करेल. फोनमध्ये डॉल्बी ATMOS साउंड देखील तुम्हाला मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, NFC आणि USB टाइप-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
यामध्ये 108-MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित Motorola च्या My UX स्किनवर काम करतो.