Moto G7 सीरीजचे रेंडर आणि किंमत झाली लीक

Moto G7 सीरीजचे रेंडर आणि किंमत झाली लीक
HIGHLIGHTS

मोटोरोलाच्या अपकमिंग सीरीज Moto G7 चे रेंडर्स लीक झाले आहेत ज्यातून डिवाइसच्या स्पेक्सचा खुलासा झाला आहे. त्याचबरोबर लॉन्च होणाऱ्या या फोन्सच्या किंमतींची पण माहिती मिळाली आहे. बोलले जात आहे कि MWC 2019 मध्ये हे स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील.

महत्वाचे मुद्दे:

  • Moto G7, Moto G7 Plus मध्ये आहे रियर कॅमेरा
  • G7 Play आणि Power मध्ये आहे रुंद नॉच
  • EUR 149 पासून सुरु होईल स्मार्टफोन्सची किंमत

जरी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला Mobile World Congress (MWC) 2019 मध्ये आपले आगामी स्मार्टफोन्स लॉन्च करणार असली तरी फोन्स बद्दल लीक्स आणि रेंडर्सचा सिलसिला अजूनही चालूच आहे. नुकताच Moto G7 सीरीजच्या रेंडर आणि किंमतीचा खुलासा झाला आहे. Moto G7, Moto G7 Power, Moto G7 Play आणि Moto G7 Plus च्या डिजाइन आणि कलर वेरिएंटचा खुलासा झाला आहे.

सोबतच Moto G7 Power ची विक्री ब्राजील मार्केट मध्ये सुरु होणार असल्याची बातमी पण समोर आली आहे. त्यामुळे या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत सार्वजनिक झाली आहे. एका टिप्सटर Ishan Agarwal ने MySmartPrice सोबत भागेदारीत Moto G7 सीरीजचे रेंडर्स लीक केले आहेत. सोबत या फोन्सच्या किंमतींचा पण खुलासा केला आहे.

या कलर वेरिएंट्स आणि किंमतीत येऊ शकतात हे फोन्स

किंमती बद्दल बोलायचे तर Moto G7 Play ची किंमत 149 यूरो म्हणजे जवळपास 12,100 रुपये सांगण्यात येत आहे. हा या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल. तर Moto G7 Plus, या सीरीजचा सर्वात प्रीमियम फोन असेल. हा फोन गोल्ड आणि ब्लू रंगांत येऊ शकतो. Moto G7 Power ची किंमत 209 यूरो म्हणजे अंदाजे 16,900 रुपयांमध्ये येऊ शकतो ज्यात ब्लॅक आणि पर्पल कलर वेरिएंट असू शकतात. तसेच Moto G7 ब्लॅक आणि व्हाइट रंगांत येण्याची शक्यता आहे. Moto G7 Plus लाल आणि ब्लू रंगात सादर केला जाऊ शकतो आणि या दोन्ही वेरिएंटच्या किंमतींची माहिती मिळू शकली नाही.

रेंडर रिपोर्ट मधून समजले हे स्पेक्स

Moto G7 आणि Moto G7 Plus वाटरड्रॉप नॉच ने सुसज्ज असू शकतात. फोन मध्ये डिस्प्लेच्या खालच्या बाजूला मोटोरोलाची ब्रॅण्डिंग असेल. तसेच रेंडर्स नुसार मागच्या बाजूस या स्मार्टफोन मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेट-अप असू शकतो. त्याचबरोबर रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि ग्लॉसी बॅक पॅनलची शक्यता आहे. Moto G7 Power आणि G7 Play जास्त रुंद नॉच सह येऊ शकतो. या फोन मध्ये पण डिस्प्लेच्या खालच्या भागात मोटोरोलाची ब्रॅण्डिंग असेल. हे दोन्ही फोन सिंगल कॅमेरा सेट-अप आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर सह उपलब्ध होऊ शकतात.

इतकेच नव्हे तर, रिपोर्ट नुसार Moto G7 आणि Moto G7 Plus मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर असू शकतो. Moto G7 Play हँडसेट स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर आणि Moto G7 Power स्नॅपड्रॅगॉन 625 प्रोसेसर सह 5000 एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येऊ शकतो.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo