हे वर्ष मोटोरोला साठी काही खास गेले नाही, पण पुढल्यावर्षी साठी मोटोरोला काही मोठे प्लान्स करत आहे. असे समोर येत आहे कि मोटोरोला पुढच्यावर्षी आपली Moto G7 सीरीज लॉन्च करू शकते. हि सीरीज वर्षाच्या सुरवातीला लॉन्च केली जाऊ शकते. जरी अजून या सीरीजच्या स्मार्टफोन्स बद्दल कंपनी कडून कोणतीही माहिती समोर आली नसली तरी लीक आणि अफवां मधून कंपनीच्या Moto G7 आणि Moto G7 Play स्मार्टफोन्स बद्दल इंटरनेट वर बातम्या यायला सुरवात झाली आहे. असे पण समोर येत आहे कि Moto G6 सीरीज च्या तुलनेत प्रत्येक बाबतीती Moto G7 सीरीज काहीही खास असेल. आता नवीन माहिती Moto G7 Play मोबाईल फोन बद्दल समोर येत आहे.
Moto G7 Play मोबाईल फोन तुम्ही FCC च्या लिस्टिंग मध्ये बघितलाच असेल, या डिवाइसचे डिटेल्स तिथे लीक झाले आहेत. असे समोर येत आहे कि या सीरीज मध्ये कंपनी कडून त्यांचे दोन पहिले स्मार्टफोन्स याच नावाने लॉन्च केले जाणार आहेत. हे फोन Moto G7 आणि Moto G7 Play असू शकतात, तसेच जर इतर फोन्स बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये नंतर कदाचित Moto G7 Plus आणि Moto G7 Power मोबाईल फोन पण लॉन्च होऊ शकतात.
असे बोलले जात आहे कि Moto G7 Play मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट मिळणार आहे, तसेच फोन मध्ये तुम्हाला एक USB Type C Port, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि एक MicroSD कार्ड स्लॉट मिळणार आहे.
तसेच Moto G7 Play मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 2820mAh क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते, जो याच मोबाईलच्या मागच्या पिढीच्या तुलनेत खूप कमी आहे. जर Moto G6 Play मोबाईल फोन बद्दल बोलायचे तर यात तुम्हाला एक 4,000mAh क्षमता असलेली मोठी बॅटरी देण्यात आली होती.