Motorola चा नवा स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच, जाणून घ्या काय मिळेल विशेष? Tech News 

Motorola चा नवा स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच, जाणून घ्या काय मिळेल विशेष? Tech News 
HIGHLIGHTS

अलिडकेच Motorola Edge 50 Pro 5G फोन भारतात लाँच

यानंतर, Motorola ने आगामी स्मार्टफोनला टीज केले आहे.

आगामी फोन Moto G64 5G ची लाँच डेट जाहीर

Motorola ने अलिडकेच आपला Motorola Edge 50 Pro 5G फोन भारतात सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने मिड रेंजमध्ये म्हणजेच 31,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या प्रीमियम मोबाईल फोननंतर आता कंपनी भारतीय बाजारात आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Motorola ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलद्वारे आगामी फोन टीज केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मोबाईल फोन भारतात MOTO G64 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा: Oppo ने आपल्या नवीनतम स्मार्टफोनमध्ये आणले New AI फिचर, त्वरित काढेल तुमच्या फोटोजमध्ये नको असलेले ऑब्जेक्ट्स। Tech News

Motorola Upcoming Smartphone

वर सांगितल्याप्रमाणे, Motorola ने आगामी स्मार्टफोनला टीज केले आहे. वर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये आपण पाहू शकता की, कंपनी #UnleashTheBeast हॅशटॅगसह आपल्या फोनची जाहिरात करत आहे. त्यानंतर, कंपनीने फोनची आणखी एक पोस्ट शेअर करत आगामी फोन Moto G64 5G ची लाँच डेट जाहीर केली आहे.

पोस्टनुसार, Motorola चा आगामी Moto G64 5G स्मार्टफोन 16 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साईटशिवाय Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

Moto G64 5G

हा Motorola फोन नुकतेच बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7025 चिपसेटने सुसज्ज असल्याचे सांगितले जाते. 12GB रॅम आणि Android 14 OS असणाऱ्या फोनची माहितीही Geekbench वर मिळाली आहे. Moto G64 5G ला सिंगल-कोरमध्ये 1026 आणि मल्टी-कोरमध्ये 2458 गुण असे बेंचमार्क स्कोअर मिळाले आहेत.

Moto G54 5G

Moto G54 5g
Moto G54 5g

Moto G54 5G हा स्मार्टफोन 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 6.5 इंच लांबीच्या फुल HD + डिस्प्लेला सपोर्ट करते, जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Dimensity 7020 octa-core प्रोसेसर प्रदान केले आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP मॅक्रो + डेप्थ सेन्सरसह कार्य करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोन मजबूत 6,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो, जो 33W टर्बो चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo