6000mAh बॅटरीसह येणारा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G64 5G ची पहिली Sale आज! मिळणार Best ऑफर्स 

6000mAh बॅटरीसह येणारा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G64 5G ची पहिली Sale आज! मिळणार Best ऑफर्स 
HIGHLIGHTS

Moto G64 5G ची पहिली विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आज सुरु होणार

सेलदरम्यान बँक डिस्काउंटपासून ते नो-कॉस्ट EMI पर्यंत सर्व ऑफर्स मिळणार आहेत.

स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7025 चिपसेट उपलब्ध आहे.

लेटेस्ट स्मार्टफोन Moto G64 5G गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला आहे. आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी हा स्मार्टफोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. Moto G64 5G ची पहिली विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला बँक डिस्काउंटपासून ते नो-कॉस्ट EMI पर्यंत सर्व ऑफर्स मिळणार आहेत. Moto G64 5G च्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 6000mAh ची जम्बो बॅटरी देण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Moto G64 5G ची किंमत आणि सेल ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: 108MP कॅमेरासह itel S24 स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लाँच, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Moto G64 5G ची किंमत आणि ऑफर्स

स्मार्टफोन ब्रँड Motorola ने Moto G64 5G हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवली आहे. तर, त्याचे 12GB+256GB स्टोरेज मॉडेल 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1,100 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, हँडसेटवर परवडणारी EMI देखील उपलब्ध असेल.

Moto G64 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G64 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास बसवण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7025 चिपसेट आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यासोबत 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

moto g64 5g

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी सेन्सर 50MP आहे, जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, या सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी यामध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी USB टाइप-C पोर्ट, ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo