मोटोरोला चा आगामी फोन Moto G6 चीन च्या टेलीकॉम्यूनिकेशन ऑथरिटी TENAA वर दिसला आहे, ज्या वरून असा अर्थ लावला जात आहे की कंपनी Moto G6 स्मार्टफोन लवकरच सादर करू शकते.
TENAA वर हा फोन मॉडेल नंबर XT1925-10 सह दिसला आहे आणि वेबसाइट ने या फोन च्या बॅटरी आणि स्क्रीन साइज बद्दल पण खुलासा केला आहे. या फोन च्या बाबतित आधी आलेल्या काही लीक्स नुसार हा डिवाइस 2 वेरियंट मध्ये येऊ शकतो, पहिला 3GB रॅम/32GB स्टोरेज आणि दूसरा 4GB रॅम/64GB स्टोरेज. हो पण सर्व भागांमध्ये हे दोन वेरियंट मॉडेल उपलब्ध होणार नाहीत.
लीक वरून समोर आलेल्या Moto G6 स्मार्टफोन च्या फोटो वरून समजत आहे की या फोन चा कर्व्ड ग्लास पॅनल Moto X4 प्रमाणे असेल आणि हा 18:9 एस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह येऊ शकतो. मागच्या लीक वरून अनुमान लावला जात आहे की या फोन ची किंमत $240 असेल पण ही किंमत बदलू पण शकते.
या फोन च्या बाबतित आधी आलेल्या लीक्स नुसार, Moto G6 2160 x 1080 च्या FHD+ रिजॉल्यूशन सह येईल. तसेच या फोन मध्ये एंड्रॉयड ओरियो असण्याची शक्यता नाकारता येत नाही.