काही दिवसांपूर्वी आलेल्या नुसार अंदाज लावला जात होता कि Moto G6 आणि G6 Play 3 एप्रिलला लॉन्च केले जातील. एका नव्या रिटेलर लीक नुसार हे फोन्स मे च्या मध्यात लॉन्च केले जातील. U.S. इलेक्ट्रॉनिक रिटेलर Fry च्या ऑनलाइन लिस्टिंग मध्ये Moto G6 आणि G6 Play स्मार्टफोंस दिसले होते. पण काही वेळाने हे फोटो हटवण्यात आले होते पण हे फोटो हटवण्याआधी या डिवाइस बद्दल काही माहिती मिळाली आहे.
Moto G6 स्मार्टफोन मध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले आहे जो 1080 x 2160 FHD+ रेजोल्यूशन सह येईल आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 असेल. हा स्मार्टफोन 32GB/64GB स्टोरेज ऑप्शन्स मध्ये सादर केला जाईल आणि हा ओक्टा-कोर CPU वर चालेल ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल, सोबतच याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येईल.
Moto G6 डिवाइस च्या बॅकला डुअल कॅमेरा सेटअप असेल आणि सेल्फी साठी हा डिवाइस 8MP चा फ्रंट कॅमेरा ऑफर करेल जो एक वाइड-एंगल सेंसर आहे. डिवाइस मध्ये 3000mAh ची बॅटरी असेल आणि हा डिवाइस फेस अनलॉक फीचर सह येईल. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन मध्ये वर्चुअल हेल्पर पण असू शकतो ज्याचे नाव Moto Voice आहे आणि हा नॅचरल लँग्वेज रिकोग्निशन ला सपोर्ट करेल जो स्क्रीन बंद झाल्यावर पण वापरता येईल.
Moto G6 Play मध्ये पण G6 प्रमाणेच डिस्प्ले असेल आणि हा डिवाइस 4000mAh च्या मोठ्या बॅटरी सह येईल. डिवाइस मध्ये क्वॉड-कोर CPU असेल ज्याचा क्लॉक स्पीड 1.4GHz आहे. Moto G6 Play मध्ये 32GB स्टोरेज असेल ज्याची स्टोरेज माइक्रो SD स्लॉट ने 128GB पर्यंत वाढवीता येते. डिवाइस च्या बॅकला ”रॅपिड फोकस” 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे आणि सेल्फी साठी हा डिवाइस 5MP चा सेल्फी स्नॅपर ऑफर करेल.
Fry द्वारा पोस्ट केली गेलेल्या फोटो नुसार Moto G6 ची किंमत $249.99 असेल आणि हा 10 मे ला शिप केला जाईल. Moto G6 Play ची किंमत $199.99आहे आणि याची शिपिंग 17 मे ला सुरू होईल.