लेनोवो ने आपल्या Moto G5s स्मार्टफोन च्या किंमतीत Rs 5,000 ची कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन तुम्ही अमेजॉन इंडिया च्या माध्यमातून फक्त Rs 9,999 च्या किंमतीत घेऊ शकता. हा स्मार्टफोन 45व्या एनिवर्सरी सेल च्या निमित्ताने घेऊ शकता. कंपनी ने ट्विटर च्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. या ऑफर लाभ तुम्ही 11 एप्रिल पर्यंत घेऊ शकता. तुम्हाला हे माहीत असेल की कंपनी ने आपला पहिला फोन 45 वर्षांपूर्वी बनवला होता.
दुसरीकडे, कंपनी ने 19 एप्रिल ला होणार्या आपल्या एका इवेंट साठी मीडिया इन्वाइटस पाठवणे सुरू केले आहे, या इवेंट मध्ये कंपनी आपला Moto G6 स्मार्टफोन सादर करू शकते. या स्मार्टफोन च्या बाबतित लॉन्च च्या आधी खुप काही समोर आले आहे.
लॉन्च च्या आधी Moto G6 स्मार्टफोन ऑनलाइन दिसला आहे आणि हा डिवाइस या लीक मध्ये प्रत्येक अँगल ने दाखवण्यात आला आहे. जर लीक रेंडर बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले असणार आहे. सोबत यात एक एयरपीस, सेंसर आणि फ्रंट फ्लॅश डिस्प्ले च्या वर असेल. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये एक कॅप्सूल च्या आकाराचा फिंगरप्रिंट सेंसर पण असणार आहे. हा स्मार्टफोन मध्ये बॉटमला डिस्प्ले च्या वर असेल. तसेच स्मार्टफोन च्या बॅक ला एक ड्यूल कॅमेरा मोड्यूल आणि एक LED फ्लॅश पण असेल.
तसेच जसे की आपण Moto X4 स्मार्टफोन मध्ये पहिले होते, Moto G6 स्मार्टफोन मध्ये पण फ्रंट आणि बॅक मध्ये एक ग्लास डिजाईन दिसत आहे. याव्यतिरिक्त हा मागून थोडासा कर्व पण असणार आहे. फोन मध्ये पॉवर आणि वॉल्यूम रॉकर बटन याच्या उजवीकडे आहेत, सोबतच बॉटम ला तुम्हाला USB Type C Port आणि हेडफोन जॅक पण फोन मध्ये असू शकतो.
जर स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर आता काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन TENAA वर दिसला आहे. TENAA वर हा फोन मॉडल नंबर XT1925-10 सह दिसला होता आणि या वेबसाइट ने या फोन ची बॅटरी आणि स्क्रीन साइज बद्दल पण खुलासा केला आहे. या फोन च्या बाबतित आधी आलेल्या काही लीक्स नुसार हा डिवाइस 2 वेरियंट मध्ये येऊ शकतो, एक 3GB रॅम/32GB स्टोरेज आणि दूसरा 4GB रॅम/64GB स्टोरेज. पण हो, सगळीकडेच हे दोन्ही वेरियंट मॉडल उपलब्ध होणार नाहीत.