Motorola च्या Affordable 5G फोनच्या किमतीत हजारो रुपयांची कपात, आता अतिशय स्वस्तात खरेदी करा। Tech News
Motorola चा Moto G54 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात
फोनच्या 8GB व्हेरिएंटची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
या फोनचा डिस्प्ले पांडा ग्लासच्या लेयरने संरक्षित आहे.
जर तुम्ही नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. Motorola चा Moto G54 5G स्मार्टफोन अगदी कमी किमतीत येईल. हा मोटोरोला स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झाला होता, जो दोन व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. या दोन्ही फोन्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Moto G54 5G ची नवी किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: प्रतीक्षा संपली! iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News
Moto G54 5G ची नवीन किंमत
Motorola ने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला होता. कंपनीने या स्मार्टफोनचे 8GB + 128GB आणि 12GB + 256GB दोन व्हेरिएंट सादर केले आहेत. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 15,999 आणि 18,999 रुपये इतकी आहे. हा हँडसेट मिंट-ग्रीन, मिडनाईट ब्लू आणि पर्ल ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, 8GB व्हेरिएंटची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यासह हा फोन 13,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर दुसरीकडे, 12GB रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत 3000 रुपयांची कपात झाली आहे, त्यानंतर आता हा फोन 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Moto G54 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हा Motorola डिव्हाइस 6.5-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेसह येतो, जो 120Hz रीफ्रेश रेटसह येतो. लक्षात घ्या की, या फोनचा डिस्प्ले पांडा ग्लासच्या लेयरने संरक्षित आहे. हा परवडणारा हँडसेट ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7020 चिपसेटसह सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेला आहे. फोनची स्टोरेज मायक्रो SD स्टोरेजद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. हा स्मार्टफोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस असलेल्या ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा समाविष्ट आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 30W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile