Moto G54 5G: मोठी बॅटरी आणि 12GB रॅमसह लेटेस्ट स्मार्टफोन भारतात सादर, जाणून घ्या सर्व तपशील

Updated on 06-Sep-2023
HIGHLIGHTS

Motorola त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G54 5G भारतात सादर केला आहे.

हा Android 14 अपडेट रेडी स्मार्टफोन आहे, ज्यासोबत 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देखील उपलब्ध आहेत.

मोबाईल फोन टर्बोचार्ज तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे अवघ्या काही मिनिटांत मोठी बॅटरी पूर्णपणे चार्ज करेल.

Motorola त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G54 5G भारतात सादर केला आहे. कंपनीने अलीकडेच घोषणा केली आहे की, ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये आपला नवीन 5G मोबाइल फोन Moto G54 5G लाँच करेल. पण हा मोटोरोला फोन चीनच्या बाजारात लाँच होण्यापूर्वीच भारतात सादर करण्यात आला आहे. कंपनीने Motorola इंडियाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आपला फोन लाईव्ह केला आहे, जिथे फोनचे सर्व तपशील पुढे आले आहेत. 

Motorola ने Moto G54 5G फोनची किंमत अद्याप सांगितलेली नाही. वेबसाइटनुसार, हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 12GB रॅम मॉडेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने खुलासा केला आहे की, Moto G54 5G मिंट ग्रीन, मिडनाईट ब्लू आणि पर्ल ब्लू कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

Moto G54 5G चे संपूर्ण तपशील

6.5-इंच फुल HD + डिस्प्लेला सपोर्ट करते. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन LCD पॅनेलवर बनवली आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Moto G54 5G फोन MediaTek च्या Dimensity 7020 octa-core प्रोसेसरवर सादर केला गेला आहे. MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर ऍप्सचा वेग वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. Moto G54 5G फोन Android 13 OS वर लॉन्च झाला आहे. हा Android 14 अपडेट रेडी स्मार्टफोन आहे, ज्यासोबत 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देखील उपलब्ध आहेत.

भारतीय बाजारपेठेत मोटोरोलाचा हा मोबाईल दोन मेमरी व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. बेस मॉडेलमध्ये 8GB RAM सह 128GB स्टोरेज आहे. तर हाय वेरिएंट 12GB RAM सह 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1TB मायक्रो SD कार्ड सपोर्ट आहे. 6,000 mAh बॅटरीने सुसज्ज असलेला Moto G54 5G फोन बाजारात दाखल झाला आहे. 6000mAh बॅटरी असलेला मोबाईल हेवी युजर्स आणि गेमर्ससाठी चांगले काम करतो. मोबाईल फोन टर्बोचार्ज तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे अवघ्या काही मिनिटांत मोठी बॅटरी पूर्णपणे चार्ज करेल. 

फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा OIS सेन्सर देण्यात आला आहे. जो 8-मेगापिक्सेल मॅक्रो + डेप्थ सेन्सरसोबत काम करतो. तर, फ्रंट पॅनलवर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :