Motorola चा लोकप्रिय स्मार्टफोन Moto G54 5G च्या किमतीत कंपनीने मोठी कपात केली आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला होता. अवघ्या 4 महिन्यांनंतर कंपनीने या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन 3000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 6000mAh आहे. जाणून घेऊयात फोनची नवी किंमत-
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Moto G54 5G स्मार्टफोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने हा फोन 15,999 रुपये किमतीत लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. त्याच्या सिंगल 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये होती. आता कपातीनंतर या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये आणि 15,999 रुपये इतकी झाली आहे.
Moto G54 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीचा फुल-HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 7020 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB रॅम आणि स्टोरेज 256GB पर्यंत आहे, जी मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
एवढेच नाही तर, या फोनला वॉटर प्रोटेक्शनसाठी IP52 रेटिंग देण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 6000mAh आहे, ज्यासोबत तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.