प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Moto G45 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा कंपनीचा नवीनतम 5G स्मार्टफोन आहे, जो बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. कमी किमतीत या फोनमध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Moto G45 5G फोनची किंमत, उपलब्धता आणि सर्व फीचर्स-
Also Read: Jio ने TV साठी लाँच केला JioTV+ ॲप! 2-इन-1 ऑफरसह मिळेल बरेच काही, वाचा डिटेल्स
Motorola ने Moto G45 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर, टॉप 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन ब्रिलियंट ब्लू, ब्रिलियंट ग्रीन आणि व्हिवा मॅजेन्टा या कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Flipkart वर 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरू होणार आहे. तर, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर Axis बँक आणि IDFC फर्स्ट बँक कार्ड्सद्वारे 1000 रुपयांची डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. या ऑफरसह तुम्हाला हे स्मार्टफोन अनुक्रमे 9,999 आणि 11,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त 10 सप्टेंबरपर्यंत लाइव्ह असेल.
Moto G45 5G फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, पॉवरसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला 20W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.