Moto G42 स्मार्टफोनची प्रतीक्षा आज संपणार आहे. कंपनी आज आपल्या लोकप्रिय G सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता लाँच होईल. कंपनीने या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाइट काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवर लाईव्ह केली होती. यामध्ये लाँच डेटसोबत काही स्पेशल स्पेसिफिकेशन्स देखील देण्यात आले आहेत. फोनमध्ये कंपनी 50MP कॅमेरा, डॉल्बी साउंड आणि 5000mAh बॅटरी यांसारखे अनेक उत्कृष्ट फीचर्स देणार आहे. Moto G42 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा : Disney+ Hotstar पूर्णपणे फ्री: मिळेल अधिक डेटा, कॉल आणि कॅशबॅक; जाणून घ्या अप्रतिम '5' प्लॅन्स
हा Moto फोन 6.5-इंच लांबीच्या फुल HD + AMOLED डिस्प्लेसह येईल. फोनमध्ये आढळलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे आणि तो सेंटर पंच-होल डिझाइनचा आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट देणार आहे. फोनच्या रॅमबद्दल फ्लिपकार्टवर अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा फोन 4 GB आणि 6 GB रॅम पर्यायांसह येण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्ट मायक्रोसाइटनुसार, हा फोन 64 GB अंतर्गत स्टोरेजसह येईल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. तसेच, सेल्फीसाठी तुम्हाला Moto G42 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट शूटर पाहायला मिळेल. Moto G42 मध्ये, कंपनी मजबूत आवाजासाठी डॉल्बी एटमॉस सपोर्ट देखील देणार आहे.
याशिवाय, हा फोन IP52 वॉटर रेसिस्टंट रेटिंग आणि वॉटर रिपेलिंग डिझाइनसह सुसज्ज आहे, ज्यामुळे तो बर्याच प्रमाणात वॉटरप्रूफ बनतो. Moto G42 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनी हा फोन मेटॅलिक रोज आणि अटलांटिक ग्रीन कलर ऑप्शनमध्ये लाँच करणार आहे.